Join us
Daily Top 2Weekly Top 5

पांढरी दाढी, लांब शर्ट अन्...; 'कालीधर लापता' सिनेमात अभिषेक बच्चनचा नवा लूक, ओटीटीवर होणार प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 13:00 IST

अभिषेक बच्चनचा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'कालीधर लापता' असं त्याच्या सिनेमाचं नाव आहे.

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनच्या एका पोस्टची चर्चा रंगली होती. अभिषेकने त्याच्या सोशल मीडियावरुन एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्याने "कधी कधी स्वत:ला भेटण्यासाठी सगळ्यांपासून 'missing' व्हावं लागतं", असं म्हटलं होतं. अभिषेकच्या या पोस्टची प्रचंड चर्चा रंगली होती. अभिषेकने अचानक अशी पोस्ट का केली? असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. आता या पोस्टमागचं गुपित उलगडलं आहे. 

अभिषेक बच्चनचा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'कालीधर लापता' असं त्याच्या सिनेमाचं नाव आहे. अभिषेकने ती पोस्ट या सिनेमाचं प्रमोशन म्हणून केली होती. आता अभिनेत्याने सिनेमाचं पोस्टर शेअर केलं आहे. 'कालीधर लापता' सिनेमाच्या पोस्टरवर अभिषेकचा नवा लूक पाहायला मिळत आहे. या पोस्टरवर अभिषेक बच्चन फूल बाह्यांच्या शर्टमध्ये दिसत आहे. तर त्याची दाढीही पांढरी झाल्याचं पाहायला मिळत आहे. झाडावर अभिषेक बच्चन आणि त्याच्यासोबत एक छोटा मुलगा बसल्याचं दिसत आहे. अभिषेक बच्चनचा हा सिनेमा ४ जुलैला झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला जाणार आहे. 

अभिषेक बच्चनने पोस्टमध्ये काय म्हटलं होतं? 

"मला एकदा हरवायचं आहे, या गर्दीत पुन्हा स्वत:ला शोधायचं आहे. जे काही होतं सगळं घरच्यांना दिलं...आता मला स्वत:साठी फक्त काही वेळ द्यायचा आहे", असं अभिषेकने पोस्टमध्ये म्हटलं होतं. त्याच्या या पोस्टची प्रचंड चर्चा रंगली होती. पण, 'कालीधर लापता' सिनेमाच्या प्रमोशनसाठी ही पोस्ट अभिनेत्याने शेअर केली होती. 

टॅग्स :अभिषेक बच्चनसिनेमा