Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोने नाही, हिरा नाही... नकली अंगठी घालून अभिषेकने केलं होतं ऐश्वर्याला प्रपोज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2023 16:27 IST

सस्पेन्स, रोमान्स, ड्रामा... अभिषेक-ऐश्वर्याच्या लव्ह स्टोरीत सर्वकाही आहे. 

बॉलिवूड कपल्सच्या लव्ह स्टोरीजबद्दल फॅन्सना उत्सुकता असते. ते प्रेमात कसे पडले, कुणी कुणाला प्रपोज केलं, त्यांची अंगठी कशी होती, लग्न कसं झालं अशा अनेक गोष्टींची जाम उत्सुकता असते. ऐश्वर्या राय- अभिषेक बच्चन  ही लोकप्रिय जोडीही त्यातलीच एक आहे.  सस्पेन्स, रोमान्स, ड्रामा... अभिषेक-ऐश्वर्याच्या लव्ह स्टोरीत सर्वकाही आहे. 

ऐश्वर्या-अभिषेक बॉलिवूडमधील पॉवरकपल आहे. ऐश्वर्या मिस वर्ल्ड तर अभिषेक मेगास्टार अमिताभ यांचा मुलगा. त्यामुळे अभिषेकने ऐश्वर्याला महागडी अंगठी घालत प्रपोज केलं असेल असं चाहत्यांना वाटतं. पण, तसं नाही. तर चक्क खोटी अंगठी घालून अभिषेकने ऐश्वर्यासारख्या सुंदरीला प्रपोज केलं होतं. विशेष म्हणजे या प्रपोजला होकार दिला होता.  

ऐश्वर्याला खोटी अंगठी का घातली याचं कारणही अभिषेकनं सांगितलं आहे. तर झालं असं होतं की, अभिषेक आणि ऐश्वर्या एकत्र ‘गुरु’ फिल्मचं शूटिंग करत होते. शुटिंगमधून वेळ मिळत नव्हता. मग प्रपोज करायला उशीर होऊ नये म्हणून अभिषेकने थेट शूटिंगमध्ये वापरण्यात येणारी खोटी अंगठी देऊनच ऐश्वर्याला प्रपोज केलं. टोरांटोमध्ये फिल्मचा प्रीमियर झाल्यावर हॉटेल रुमच्या बाल्कनीत अभिषेकनं ऐश्वर्याला प्रपोज केलं होतं. अंगठी खोटी असली तरी प्रेम खरं होतं. 

प्रीमिअरहून मुंबईला परतल्यानतंर अमिताभ बच्चन यांच्या राहत्या घरी 14 जानेवारी रोजी या दोघांचा साखरपूडा झाला होता. या दोघांच्या हायप्रोफाईल रिलेशनशिपवर सगळ्यांच्या नजरा खिळून होत्या. तर 20 एप्रिल 2007 रोजी हे लग्नाच्या पवित्र बंधनात अडकले होते. दोघांची पहिली भेट १९९९मध्ये प्रदर्शित झालेल्या 'ढाई अक्षर प्रेम के' या सिनेमाच्या सेटवर झाली होती. त्यानंतर या दोघांनी धूम २, उमरावजान आणि गुरू यांसारख्या सिनेमांत एकत्र काम केले आहे.

अभिषेकच्या सिनेकरीअरबद्दल सांगायचे तर काही दिवसांपूर्वी त्याचा 'घुमर' हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. त्याला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. तर ऐश्वर्या राय मणिरत्न यांच्या 'पोन्नियन सेल्वन २' या सिनेमात दिसली. 

टॅग्स :ऐश्वर्या राय बच्चनअभिषेक बच्चनबॉलिवूड