Join us

रेस्टॉरंटमध्ये झाली नजरानजर अन्...; 4 महिने अमिराला डेट करणाऱ्या अब्दु रोजिकची लव्हस्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2024 08:44 IST

Abdu rozik: 'कमी उंचीच्या लोकांनाही प्रेम मिळतं', असं म्हणत अब्दुने अमिरा त्याच्या प्रेमात कशी पडली हे सांगितलं.

अब्दु रोजिक हे नाव कोणासाठीही नवीन नाही. 'दुबई के छोटे भाईजान' म्हणून प्रसिद्ध असलेला अब्दु रोजिक ( Abdu Rozik)  बिग बॉसमुळे घराघरात पोहोचला. सध्या अब्दु त्याच्या लग्नामुळे चर्चेत येत आहे. नुकताच अब्दुने साखरपुडा केला आहे. त्यामुळे त्याच्या होणाऱ्या बायकोविषयी जाणून घेण्यासाठी प्रत्येक जण उत्सुक आहे. यामध्येच आता त्याची लव्हस्टोरी चर्चेत आली आहे. अब्दु, अमीराच्या प्रेमात कसा पडला. त्यांची पहिली भेट कशी झाली हे त्याने सांगितलं आहे.

येत्या ७ जुलै रोजी अब्दु, अमीरासोबत लग्न करणार आहे. त्यामुळे त्याची आणि त्याच्या पत्नीची सोशल मीडियावर कमालीची चर्चा रंगली आहे. यामध्येच त्याने त्याची लव्हस्टोरी चाहत्यांसोबत शेअर केली आहे जी चर्चेत येत आहे.

कशी झाली अब्दु-अमिराची पहिली ङेट

''अमिरा आणि माझी पहिली भेट एका रेस्टॉरंटमध्ये झाली. तिला पाहताच  क्षणी मी तिच्या प्रेमात पडलो. ती दिसायला खूप सुंदर असून तिचे केस लांबसडक आहेत. मी खरंच खूप नशीबवान आहे जे माझ्यावर प्रेम करणारी व्यक्ती मला भेटली. पहिल्याच भेटीत मी तिला माझी ओळख सांगितली आणि आम्ही नंबर एक्सचेंज केले. तेव्हापासून आम्ही सतत फोनवर बोलत रहायचो."

४ महिने केलं डेट

"मागील चार महिन्यांपासून आम्ही एकमेकांना डेट करतोय. अमिरा सध्या कॉलेजमध्ये शिकतीये. तिचं बिझनेसचं शिक्षण सुरु आहे. ज्यावेळी मी तिला पहिल्यांदा भेटलो त्याचवेळी मला जाणवलं की ही माझी जीवनसाथी होऊ शकते. मला योग्य मुलगी मिळाली आहे. ती मला खूप समजून घेते, माझा मान ठेवते. प्रत्येक निर्णयामध्ये ती माझ्यासोबत असते."

कमी उंचीच्या लोकांनाही प्रेम मिळतं

"अमिराला भेटून एक कळलं की कमी उंचीच्या लोकांनाही प्रेम मिळतं. आमचं लव्ह मॅरेज आहे. मुंबईवरुन माझे सगळे मित्र माझ्या लग्नासाठी दुबईला येणार आहेत. सलमान खान सुद्धा या कार्यक्रमात सहभागी होणार आहे," असं म्हणत अब्दुने त्याच्या होणाऱ्या बायकोविषयी आणि लग्नाविषयीचे अपडेट शेअर केले.

टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटीदुबईसलमान खानबिग बॉस