Join us
Daily Top 2Weekly Top 5

तब्बूची बहीण आणि अभिनेत्री फराहचा पूर्णपणे बदलला लूक, इतका की ओळखायलाही येत नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2022 17:05 IST

Farah naaz : यश चोप्रा यांनी फराहला पहिला  ब्रेक  'फासले' सिनेमातून दिला होता. पण तेव्हा फराह आणि यश चोप्रा यांची पत्नी पामेला यांच्यात भांडण झालं होतं. इतकंच नाही तर फराहने ‘कसम वर्दी की' च्या सेटवर अभिनेता चंकी पांडेला मारहाणही केली होती.

फराह नाज ( Farah naaz ) 90 च्या दशकात फिल्म इंडस्ट्रीत काम करत होती. ती तिच्या सौंदर्यासाठी आणि दमदार अभिनयासाठी ओळखली जात होती. फराहने अनेक सुपरहिट सिनेमे दिले. तिने बॉलिवूडमधील मोठे स्टार्स  ऋषि कपूर, संजय दत्त, अनिल कपूर, मिथुन, गोविंदा, आमिर खान सोबत काम केलं. तिच्या कामासोबतच तिच्या रागाचीही चर्चा होत होती. असं म्हटलं जातं की, फराह फारच रागीट होती आणि चुकीचं काही ती ऐकून घेत नव्हती. फराह ही अभिनेत्री तब्बूची मोठी बहीण आहे.

यश चोप्रा यांनी फराहला पहिला  ब्रेक  'फासले' सिनेमातून दिला होता. पण तेव्हा फराह आणि यश चोप्रा यांची पत्नी पामेला यांच्यात भांडण झालं होतं. इतकंच नाही तर फराहने ‘कसम वर्दी की' च्या सेटवर अभिनेता चंकी पांडेला मारहाणही केली होती. असंही सांगितलं जातं की, एका पार्टीमध्ये फराहने एका निर्मात्याला मारलं होतं. नंतर तिने सांगितलं होतं की, जे पी दत्ताच्या पार्टीत फिल्म मेकर फारूख नाडियाडवालाने फराहला बीअर ऑफर केली होती. याचा तिला राग आला होता.

पर्सनल लाइफबाबत सांगायचं तर फराहने करिअर जोरात सुरू असताना इंडस्ट्री सोडली आणि लग्न केलं. फराहने बिंदू दारा सिंहसोबत लग्न केलं होतं. बिंदू तेव्हा सिनेमात येण्यासाठी प्रयत्न करत होता. तेव्हा फराह फेमस अभिनेत्री होती. दोघांनी परिवाराच्या विरोधात जाऊन लग्न केलं होतं. पण केवळ 6 वर्षात दोघे वेगळे झाले. 

असं सांगितलं जातं की, बिंदूच्या परिवाला वाटत होतं की, लग्नानंतर तिने सिनेमात काम करू नये. बिंदूपासून वेगळी झाल्यावर फराहने अभिनेता सुमीत सहगलसोबत लग्न केलं आणि बिंदूने एका रशियन मॉडेलसोबत लग्न केलं. दोघेही आपापल्या परिवाराला आनंदी आहेत. फराह मुंबईत पती आणि मुलासोबत राहते. आता तिचा लूक फारच बदलला आहे.

टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटी