Join us
Daily Top 2Weekly Top 5

Video: आमिर खान आणि विकी कौशलने वाकून केला अशोक सराफ यांना नमस्कार; सोहळ्यातील 'तो' खास क्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 21:42 IST

अशोक सराफ यांना बॉलिवूडचे धुरंधर आमिर खान आणि विकी कौशल यांनी वाकून नमस्कार केल्याचं पाहायला मिळालं.

महाराष्ट्रातील सर्वात मोठा आणि चर्चेत असणारा बहुप्रतिक्षित लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर अवॉर्ड्स २०२६ हा सोहळा  'गेटवे ऑफ इंडिया' येथे आज पार पडला. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मराठी चित्रपटसृष्टीचे 'अभिनय सम्राट' अशोक सराफ, ज्येष्ठ अभिनेते आमिर खान, विकी कौशल यांसह राज्यभरातील मान्यवरांनी हजेरी लावली होती. या सोहळ्यातील एक खास क्षण सगळ्यांचे लक्ष वेधून घेणारा ठरला. या कार्यक्रमात अशोक सराफ यांना पाहताच बॉलिवूडचे धुरंधर आमिर खान आणि विकी कौशल यांनी वाकून नमस्कार केल्याचं पाहायला मिळालं.

आमिर खाननं पुरस्कार सोहळ्यात अशोक सराफ यांची भेट घेतली. यावेळी त्यानं अशोक सराफ यांना वाकून नमस्कार केला. तर विकी कौशलनं अशोक सराफ यांची खास भेट त्यांच्या पाया पडत आशिर्वाद घेतले. बॉलिवूडमधील या दोन लोकप्रिय कलाकारांनी दाखवलेला हा नम्र आणि 'डाउन टू अर्थ' स्वभाव पाहून उपस्थितांसह चाहत्यांनीही त्यांचं भरभरून कौतुक केलं.

मराठी चित्रपटसृष्टीचे 'अभिनय सम्राट' अशोक सराफ यांना  'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर - जीवनगौरव' पुरस्काराने गौरवण्यात आलं. तर विकील कौशल याचा  'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२६ - अभिनेता' या पुरस्काराने सन्मान करण्यात आला. 

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' अवॉर्ड्स

महाराष्ट्रातील सर्वात मोठा अन् मानाचा पुरस्कार सोहळा म्हणजे 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' अवॉर्ड्स. लोकसेवा/समाजसेवा, कृषी, शिक्षण, क्रीडा, प्रशासन, वैद्यकीय, उद्योग, स्टार्ट अप या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना दरवर्षी या पुरस्कारानं गौरवण्यात येतं.  'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर'चं हे १२ वे वर्ष आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Aamir Khan and Vicky Kaushal bow to Ashok Saraf: Special moment

Web Summary : At Lokmat Maharashtrian of the Year Awards 2026, Aamir Khan and Vicky Kaushal respectfully greeted veteran actor Ashok Saraf. Saraf received a Lifetime Achievement Award, while Kaushal was named Best Actor. The event celebrated excellence across various fields in Maharashtra.
टॅग्स :लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2026अशोक सराफविकी कौशलआमिर खान