Join us

आमिर खान नववर्षांत करणार ही पाच कामे!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2019 14:28 IST

 बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा आमिर खान याने नव्या वर्षात नवा संकल्प सोडलाय. होय, २०१९ मध्ये आमिरने पाच संकल्प केले आहेत.

ठळक मुद्देगतवर्षात आमिरचा ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ प्रदर्शित झाला. या चित्रपटाकडून आमिरलाच नाही तर चाहत्यांनी प्रचंड अपेक्षा होत्या. पण हा चित्रपट दणकून आपटला. यातून मोठा धडा घेत, आमिरने नव्या वर्षांत पाच संकल्प सोडले.

 बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा आमिर खान याने नव्या वर्षात नवा संकल्प सोडलाय. होय, २०१९ मध्ये आमिरने पाच संकल्प केले आहेत. आमिरने सोशल मीडियावर आपले नवसंकल्प सांगणारी एक खास पोस्ट शेअर केली आहे. २०१८ हे वर्ष आमिरसाठी फार खास नव्हते. गतवर्षात त्याचा ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ प्रदर्शित झाला. या चित्रपटाकडून आमिरलाच नाही तर चाहत्यांनी प्रचंड अपेक्षा होत्या. पण हा चित्रपट दणकून आपटला. यातून मोठा धडा घेत, आमिरने नव्या वर्षांत पाच संकल्प सोडले.

आमिरचा पहिला संकल्प आहे तो, टॉप शेपमध्ये येण्याचा. होय, म्हणजे नव्या वर्षांत आमिर अधिकाधिक आपल्या फिटनेसकडे लक्ष देणार आहे. दुसरा संकल्प आहे, २०१८ मध्ये झालेल्या चुकांपासून धडा घेत, पुढे जाण्याचा. तिसरा संकल्प आहे, प्रेक्षकांना सर्वोत्तम चित्रपट देण्याचा, चौथा संकल्प आहे, काही नवे शिकण्याचा आणि पाचवा व शेवटचा संकल्प आहे, आई, मुले व पत्नी किरणला अधिकाधिक वेळ देण्याचा.या संकल्पांसोबतच आमिर खानने क्षमायाचनाही केलीय. होय, जाणते-अजानतेपणाने कुणाला दुखावले असल्यास मी क्षमा मागतो, असे आमिरने लिहिले आहे.  

काल सोमवारी आमिरने त्याचा नवा चित्रपट ‘रुबरू रोशनी’ची घोषणा केली. येत्या २६ जानेवारीला छोट्या पडद्यावर या चित्रपटाचे प्रीमिअर होणार आहे. आमिरने पत्नी किरणसोबत मिळून या चित्रपटाची निर्मिती केली आहे तर स्वाती चक्रवर्तीने याचे दिग्दर्शन केले आहे. हा असा चित्रपट आहे, जो किरण व माझ्या अतिशय जवळचा आहे. ‘रुबरू रोशनी’ पाहायला विसरू नका, असे आमिरने शेअर केलेल्या व्हिडिओत म्हटले आहे.

टॅग्स :आमिर खाननववर्ष 2019