Join us
Daily Top 2Weekly Top 5

"कमी उंचीमुळे मला करिअरच्या सुरुवातीला...", आमिर खानचा खुलासा; स्वत:वर जोक करण्यात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 16:21 IST

"अमिताभ बच्चन यांच्याकडे पाहून वाटायचं..." , आमिर खानचा खुलासा

अभिनेता आमिर खान (Aamir Khan) लवकरच 'सितारे जमीन पर' सिनेमात दिसणार आहे. यामध्ये तो दिव्यांग मुलांच्या बास्केटबॉल कोचच्या भूमिकेत आहे. सिनेमाच्या ट्रेलरमध्ये आमिरची आई त्याला 'टिंगू' बोलताना दिसते. आमिरची उंची कमी असल्याने त्याला अनेकदा त्यावरुन चिडवलं जातं. आता नुकतंच आमिरने त्यावर भाष्य केलं आहे. करिअरच्या सुरुवातीला कमी उंचीचा त्याला न्यूनगंड होता असा त्याने खुलासा केला आहे.

'जस्ट टू फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत आमिर खानला प्रश्न विचारण्यात आला. स्वत:चीच खिल्ली उडवण्यात आता तू कंफर्टेबल झाला आहेस का असं त्याला विचारण्यात आलं. यावर तो म्हणाला, "जावेद साहेबांनी मला एकदा ह्युमबरबद्दल सांगितलं होतं जे मला पटलं होतं. ते म्हणालेले की जेव्हा तुम्ही आयुष्यात कठीण प्रसंगातून जात असता अशा वेळी तुम्हाला ह्युमर हाताळता आला पाहिजे. एकदा का तुम्हाला हे जमलं की मग धक्का बसत नाही. मला वाटतं मला कायमच हे जमलं आहे आणि सिनेमातही हेच अधोरेखित केलं आहे."

तो पुढे म्हणाला, "करिअरच्या सुरुवातीला मी खूप घाबरलो होतो. अमिताभ बच्चन तेव्हा एक नंबरवर होते आणि त्यांची सहा फूटपेक्षा जास्त होती. विनोदजी, शत्रुघ्न सिन्हा सगळेच उंच होते. माझ्यासारख्या कमी उंची असलेल्याचं इथे काही होईल की नाही असंच मला वाटायचं. मला याचं खूप टेन्शन यायचं. पण नंतर सगळं ठीक झालं."'सितारे जमीन पर' येत्या २० जून रोजी रिलीज होणार आहे. हा एका स्पॅनिश सिनेमाचा रिमेक आहे. सिनेमात जिनिलिया डिसूझाही मुख्य भूमिकेत आहे. तसंच आयुष भंसाळी, ऋषी साहनी, ऋषभ जैन, नमन मिश्रा, वेदांत शर्मा, संवित देसाई, अरुश दत्ता, गोपी कृष्ण वर्मा, आशिष पेंडसे आणि सिमरन मंगेशकर यांचीही भूमिका आहे. 

टॅग्स :आमिर खानबॉलिवूड