Join us

आमिर-जुनैदनं रिक्रिएट केला 'अंदाज अपना अपना' मधील आयकॉनिक सीन, पाहा मजेशीर VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 16:36 IST

या मजेशीर व्हिडीओने सोशल मीडियावर धमाल उडवून दिली आहे. 

Sitaare Zameen Par Youtube Release: बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' आमिर खान नेहमीच आपल्या हटके अंदाजासाठी ओळखला जातो. सध्या तो 'सितारे जमीन पर' चित्रपटामुळे चर्चेत आहे. बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरलेला हा चित्रपट आमिर खान यूट्यूबवर प्रदर्शित करत आहे. त्यामुळे सध्या आमिर या सिनेमाचं प्रमोशन करताना दिसून येतोय. नुकतंच त्यानं लेक जुनैदसोबत मिळून 'अंदाज अपना अपना' या क्लासिक चित्रपटातील आयकॉनिक सीन रिक्रिएट करत 'सितारे जमीन पर'चं प्रमोशन केलंय. यूट्यूबवर प्रदर्शित होणाऱ्या 'सितारे जमीन पर' साठी अशा हटके प्रमोशनमुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आणखीच वाढली आहे.

आमिर आणि जुनैद यांनी 'अंदाज अपना अपना' या कल्ट क्लासिक चित्रपटातील आयकॉनिक सीन पुन्हा रिक्रिएट केला. हा व्हिडीओ 'आमिर खान टॉकिज' या युट्यूब चॅनलवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओची सुरुवात अशी होते की, आमिर खानच्या घरातील काही कर्मचारी त्यांच्या मोबाईलवर 'सितारे जमीन पर' चित्रपट पाहताना दिसतात. आमिर अचानक तिथे येतो आणि त्यांच्यावर ओरडतो की त्याचा चित्रपट असा मोबाइलवर डाऊनलोड करून पाहण्याचा धाडस कसं केलं? त्यावर एक कर्मचारी स्पष्ट करतो की, तो पैसे देऊन हा चित्रपट पाहतोय. त्यानंतर तो सांगतो,  जुनैदनं एक नवीन योजना आणली असून ते एकटाच स्वतःशी बडबडत आहे. यानंतर आमिर जुनैदच्या खोलीत जातो. 

यावेळी जुनैद वडिलांचा 'अंदाज अपना अपना' चित्रपटातला सीन रिक्रिएट करत आमिरचे भरभरून कौतुक करताना दिसतो. व्हिडीओच्या शेवटी आमिर आपल्या मुलाला "निकम्मा", "नेपो किड", "नामाकूल" असं म्हणताना दिसलाय.  या मजेशीर व्हिडीओने सोशल मीडियावर धमाल उडवून दिली आहे. 

'सितारे जमीन पर' १ ऑगस्टपासून यूट्यूबवर

'सितारे जमीन पर' हा चित्रपट थिएटरमध्ये पाहायचा राहून गेला असेल, तर आता घरी बसून यूट्यूबवर तो पाहण्याची संधी आहे. १ ऑगस्टपासून हा चित्रपट 'आमिर खान टॉकीज' या यूट्यूब चॅनेलवर अवघ्या १०० रुपयांत पाहता येणार आहे. हा चित्रपट फक्त यूट्यूबवर उपलब्ध असेल आणि इतर कोणत्याही डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार नाही. आमिर खान, जिनिलिया देशमुख यांच्याबरोबर, बौद्धिक अपंग असलेले १० कलाकारदेखील या चित्रपटाचा एक महत्त्वाचा भाग आहेत.

टॅग्स :आमिर खानबॉलिवूडयु ट्यूबजुनैद खान