Join us
Daily Top 2Weekly Top 5

आमीर खानने DDLJ सिनेमाची केली प्रशंसा, सांगितलं सिनेमात काय होतं खास!

By अमित इंगोले | Updated: October 21, 2020 10:52 IST

आजही रोमॅंटिक सिनेमात DDLJ सर्वात वर गणला जातो. अशात जेव्हा सिनेमाचं २५ वर्षे पूर्ण झाले तर सेलिब्रिटीही या सिनेमाच्या आठवणी शेअर करत आहेत. अनेकजण सिनेमाचं कौतुक करत आहे. 

बॉलिवूडचे असे अनेक सिनेमे आहेत जे वर्षानुवर्षे आवडीने बघितले जातात. असाच एक सिनेमा म्हणजे शाहरूख खान आणि काजोलचा 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'. तसा हा सिनेमा १९९५ मध्ये रिलीज झाला होता, पण २५ वर्षांनंतर आजही हा बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय सिनेमा मानला जातो. आजही रोमॅंटिक सिनेमात DDLJ सर्वात वर गणला जातो. अशात जेव्हा सिनेमाचं २५ वर्षे पूर्ण झाले तर सेलिब्रिटीही या सिनेमाच्या आठवणी शेअर करत आहेत. अनेकजण सिनेमाचं कौतुक करत आहे. 

आमीर खानने केली प्रशंसा

अभिनेता आमीर खानने शाहरूख खानच्या या सिनेमाचं भरभरून कौतुक केलं आहे. त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून या सिनेमाची खासियत सांगितली आहे. त्याच्यानुसार, या सिनेमात सगळंकाही बघायला मिळालं होतं. पोस्टमध्ये आमीरने लिहिले की, 'असा हिरो जो स्वत:चा शोध घेतो, एक अभिनेत्री स्वत:चा आतील आवाज ओळखते, एक असा व्हिलन ज्याचं हृदय परिवर्तन होतं. हा सिनेमा आपल्यातील चांगलेपणा आणि उंची दाखवतो. २५ वर्षे झालीत तरी या सिनेमाचा प्रभाव लोकांवर कायम आहे. धन्यवाद आदि, शाहरूख, काजोल आणि संपूर्ण टीम'. (शाहरूखला करायची नव्हती ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’मध्ये राजची भूमिका, कारण वाचून व्हाल अवाक्...)

तसं तर आमीरकडून शाहरूखचं कौतुक होत असल्याने दोघांचेही फॅन्स आनंदी नक्कीच आहेत. पण एक वेळ अशीही होती की, याच सिनेमामुळे आमीरने सिनेमांच्या अवॉर्ड शोमध्ये जाणं बंद केलं होतं. मीडिया रिपोर्टनुसार, फिल्मफेअर अवॉर्डमध्ये आमीरचा 'रंगीला' आणि शाहरूखचा DDLJ या सिनेमांना अनेक नामांकने मिळाली होती. पण त्यावेळी शाहरूख खानला अवॉर्ड मिळाला होता. त्यावेळी आमीर थोडा निराश झाला होता आणि त्याला हा निकाल मान्य नव्हता. आता दोघेही सुपरस्टार आहेत आणि एकमेकांच्या कामाचा सन्मान करतात. (अहो खरचं,अजय देवगणने आजपर्यंत पाहिला नाही DDLJ सिनेमा, कारण वाचून व्हाल हैराण)

टॅग्स :आमिर खानशाहरुख खानकाजोलआदित्य चोप्रा बॉलिवूड