Join us
Daily Top 2Weekly Top 5

आमिर खानने राजा हिंदुस्तानीसाठी करिश्मा कपूरसोबत 47 वेळा केलं होतं लीपलॉक, हैराण करणार होते यामागचं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2023 18:43 IST

या सिनेमात आमिर खान आणि करिश्मा कपूर या जोडीने साधारण 1 मिनिट लांब किसींग सीन केला होता

आमिर खान आणि करिश्मा कपूर यांचा ९० च्या दशकात रिलीज झालेला राजा हिंदुस्तानी हा त्यांच्या करिअरमधील हिट चित्रपटांपैकी एक आहे. वर्षांनंतरही हा चित्रपट आणि त्यातील गाणी आजही आवडतात. ‘राजा हिंदुस्तानी’ सिनेमाने केवळ करिश्मा कपूरचं करिअरच वाचवलं नाही तर, तिला रातोरात स्टार बनवलं होतं. या सिनेमाशी संबंधित सगळ्या गोष्टी आजही लोकांच्या मनात आहेत. मग तो करिश्मा कपूर आणि आमिर खानची दमदार अभिनय असो वा या सिनेमातील गाणी असोत. ‘राजा हिंदुस्तानी’ सिनेमाला त्यावेळच्या सगळ्यात बोल्ड सिनेमात मोजलं जातं. याचं कारण म्हणजे या सिनेमातील किसींग सीन. ज्यामुळे एकच वादळ उठलं होतं.

या सिनेमात आमिर खान आणि करिश्मा कपूर या जोडीने साधारण 1 मिनिट लांब किसींग सीन केला होता. त्या काळात असे सीन करण्यास हिरोईन नकार देत होत्या, तेव्हा करिश्माने एक मिनिट लांब किसींग सीन देऊन धुमाकूळ घातला होता. हा सीन पडद्यावर जेवढा जबरदस्त वाटला, तेवढा तो शूट करणं सोपं नव्हतं.

राजीव मसंदच्या एका जुन्या मुलाखतीत करिश्मा कपूरने या किसींगची आठवण काढत सांगितलं होतं की, हा सीन शूट करण्यात तिची आणि आमिर खानची घालत खराब झाली होती. 1 मिनिटांचा सीन शूट करण्याआधी दोघेही घाबरले होते. सिनेमातील हा सीन फेब्रुवारी महिन्यात उटीमध्ये शूट झाला होता.

त्यावेळी उटीमध्ये खूप जास्त थंडी होती. कडाक्याची थंडी, वेगाने वाहणारा वारा आणि गोठवणाऱ्या थंड पाण्यात या जोडीने हा सीन शूट केला होता. हा सीन शूट करण्यासाठी तीन दिवसांचा वेळ लागला होता. तसेच या सीनसाठी साधारण 47 रिटेक घेण्यात आले होते. हा सीन शूट करताना आमीर खान आणि करिश्मा कपूर याचाच विचार करत होते की, कधी एकदाचं या सीनचं शूटींग संपतं.

3 दिवसांच्या कठोर मेहनतीनंतर जेव्हा डायरेक्टरला परफेक्ट शॉट मिळाला तेव्हा आमीर खान आणि करिश्मा कपूर आनंदाने नाचले होते. त्यावेळी ही जोडी सकाळी 7 वाजेपासून ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत शूट करत होते. करिश्मा म्हणाली की, त्यावेळी अशा परिस्थितीमध्ये शूट करणं एक फार वेगळा अनुभव होता. 

टॅग्स :आमिर खानकरिश्मा कपूर