आमिर खानचा लेक जुनैद खानचा 'एक दिन' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात जुनैद खानसोबत साऊथ स्टार साई पल्लवी मुख्य भूमिकेत आहे. 'एक दिन'चा प्रमोशनल इव्हेंट नुकताच पार पडला. या इव्हेंटला आमिर खानने हजेरी लावली होती. इव्हेंटमध्ये लेकाचा अभिनय पाहून आमिरला अश्रू अनावर झाले. या इव्हेंटमधील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आमिर खानसोबत या इव्हेंटला त्याची गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटही हजर होती.
विरल भय्यानी या पापाराझी अकाऊंटवरुन आमिरचा इव्हेंटमधला एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये आमिर रडताना दिसत असून डोळे पुसत आहे. त्याच्या बाजूला साई पल्लवी बसल्याचं दिसत आहे. आमिरला रडताना पाहून साई पल्लवीदेखील आश्चर्याने त्याच्याकडे पाहत आहे. आमिरने या इव्हेंटमध्ये साई पल्लवी आणि जुनैद खानच्या अभिनयाचं कौतुक केलं. तो म्हणाला, "साई पल्लवी भारतातील उत्तम अभिनेत्री आहे. जुनैदनेही चांगलं काम केलं आहे". आमिरच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत.
आमिरने 'एक दिन' या सिनेमाची निर्मिती केली आहे. १ मे २०२६ रोजी 'एक दिन' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून जुनैद खान आणि साई पल्लवी पहिल्यांदाच एकमेकांसोबत काम करणार आहेत. ही एक प्रेमकहाणी असून सर्वांना या सिनेमाची उत्सुकता आहे.
Web Summary : Aamir Khan teared up at the promotional event for his son Junaid Khan's upcoming film, 'Ek Din,' co-starring Sai Pallavi. A video of Aamir moved by their performances went viral. He praised Sai Pallavi as one of India's best actresses.
Web Summary : आमिर खान अपने बेटे जुनैद खान की आने वाली फिल्म 'एक दिन' के प्रमोशनल इवेंट में भावुक हो गए, जिसमें साईं पल्लवी भी हैं। उनके प्रदर्शन से प्रभावित आमिर का एक वीडियो वायरल हो गया। उन्होंने साईं पल्लवी को भारत की सर्वश्रेष्ठ अभिनेत्रियों में से एक बताया।