Join us
Daily Top 2Weekly Top 5

'सितारे जमीन पर'मधील आमिर खान-जिनिलीयावर चित्रित झालेलं खास गाणं रिलीज, अरिजीत सिंगचा आवाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 13:00 IST

'सितारे जमीन पर' सिनेमातील सर आँखो पर मेरे हे नवीन गाणं रिलीज झालं असून प्रेक्षकांना या गाण्यात आमिर-जिनिलीया या जोडीची केमिस्ट्री बघायला मिळतेय

२०२५ मधील सर्वाधिक प्रतिक्षित चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणजे ‘सितारे जमीन पर’. या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच, या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला आमिर खानच्या चाहत्यांचा उदंड प्रतिसाद दिसला आहे. या चित्रपटात आमिर खानसोबत जिनिलीया देशमुखही खास भूमिकेत आहे. नुकतंच आमिर-जिनिलीयावर चित्रित झालेलं 'सर आँखो पे मेरे' गाणं रिलीज झालंय.

'सर आँखो पे मेरे'  गाणं रिलीज

‘सितारे ज़मीन पर’च्या निर्मात्यांनी या चित्रपटातील एक सुंदर गाणं ‘सर आँखों पे मेरे’ प्रदर्शित केलं आहे. अरिजीत सिंगच्या भावपूर्ण आवाजात हे गाणं अधिकच हृदयस्पर्शी बनलं आहे. आमिर खान आणि जिनिलीया देशमुख यांच्यावर चित्रित केलेले हे गाणं प्रेमाची गोडी आणि शांतता याचा अनुभव देतं. आमिर-जिनिलीया या नव्या जोडीची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच छाप पाडतेय. शंकर-एहसान-लॉय यांच्या संगीतामुळे गाणं श्रवणीय आणि हृदयस्पर्शी झालं आहे.

कधी रिलीज होणार ‘सितारे जमीन पर’

‘सितारे जमीन पर’ या चित्रपटात १० नवोदित कलाकार अरूष दत्ता, गोपी कृष्ण वर्मा, सम्वित देसाई, वेदांत शर्मा, आयुष भंसाली, आशीष पेंडसे, ऋषी शाहानी, ऋषभ जैन, नमन मिश्रा आणि सिमरन मंगेशकर यांचा विशेष सहभाग आहे. आमिर - जिनिलीया या सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. ‘सितारे ज़मीन पर’ हा बहुप्रतिक्षित चित्रपट येत्या २० जून २०२५ रोजी संपूर्ण भारतात चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. सर्वांना या चित्रपटाची उत्सुकता आहे.

टॅग्स :आमिर खानजेनेलिया डिसूजाबॉलिवूड