OTT Movies: ओटीटीवर दिवसेंदिवस वेगवेगळ्या प्रकारचा कंटेन्ट पाहणारा प्रेक्षकवर्ग तयार होत आहे. अनेकदा बॉक्स ऑफिसवर यशस्वी न झालेल्या चित्रपटांना ओटीटीवर प्रेक्षकांची पसंती मिळते. कारण तिकिटांवर भरमसाठ खर्च करावा लागत नाही, त्याचबरोबर ते घरबसल्या पाहता येतात. अशाच एका चित्रपटाची सिनेप्रेमींमध्ये चर्चा रंगली आहे. हा चित्रपट मात्र बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता. पण आता, ओटीटीवर आल्यानंतर त्याचे नशीब पालटले आहे.
दरम्यान, या चित्रपटाचं नाव हॅप्पी पटेल आहे. हा स्पाय रोमॅंटिक कॉमेडी चित्रपट १६ जानेवारी २०२६ रोजी प्रदर्शित झाला. आमिर खान प्रॉडक्शन्सअंतर्गत ‘हॅप्पी पटेल : खतरनाक जासूस’ या चित्रपटाचं लेखन वीर दास आणि अमोघ रणदिवे यांनी मिळून केलं आहे. या चित्रपटात अभिनेता वीर दास मुख्य भूमिकेत आहे. त्याच्यासह मोना सिंग, मिथिला पालकर, शारिब हाश्मी, विश्वजीत कुलकर्णी अशा अनेक कलाकारांनी या सिनेमात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. कलाकारांची मांदियाळी असूनही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आदळला. चित्रपट एक महिनाही थिएटरमध्ये टिकू शकला नाही.
बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, वीर दासच्या या चित्रपटाचे लाईफटाईम कलेक्शन ५.५२ कोटी रुपये होते, ज्यामुळे हा चित्रपट सपशेल अपयशी ठरला. त्यामुळे थिएटर रिलीजनंतर तो निर्मात्यांनी ओटीटीवर रिलीज केला. अलिकडेच १ एप्रिलला हा चित्रपट ओटीटीवर स्ट्रीम करण्यात आला आहे. नेटफ्लिक्सवर रिलीज झाल्यानंतर या सिनेमाला सर्वाधिक पसंती मिळताना दिसते आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट मोठ्या प्रमाणात पाहिला जात असल्यामुळे, तो सध्या तिसऱ्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे.
Web Summary : The film 'Happy Patel,' a box office failure, has found new life on Netflix. Released in 2026, the film is now trending at number three, proving popular on digital platforms after its theatrical flop.
Web Summary : बॉक्स ऑफिस पर असफल रही फिल्म 'हैप्पी पटेल' को नेटफ्लिक्स पर नई जिंदगी मिली है। 2026 में रिलीज हुई यह फिल्म अब तीसरे नंबर पर ट्रेंड कर रही है, जो थिएटर में फ्लॉप होने के बाद डिजिटल प्लेटफॉर्म पर लोकप्रिय हो रही है।