Join us
Daily Top 2Weekly Top 5

आरजेनंतर विद्या बालन बनली रॅपर, ‘धुन बदल के तो देखो विथ विद्या बालन’साठी बनवला रॅप व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2019 10:26 IST

बॉलिवूडमध्ये विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारी अभिनेत्री विद्या बालन नव्या भूमिकेतून रसिकांच्या समोर आली आहे

बॉलिवूडमध्ये विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारी अभिनेत्री विद्या बालन नव्या भूमिकेतून रसिकांच्या समोर आली आहे. ती बिग एफएमने रेडिओ वाहिनीवर आरजे म्हणून दाखल झाली आहे. मुथूट फिनकार्प सादरकर्ते असलेला ‘धुन बदल के तो देखो विथ विद्या बालन’ हा शो नुकताच लाँच केला आहे.

अभिनेत्री विद्या बालन मुथूट ब्लू ‘धुन बदल के तो देखो विथ विद्या बालन’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून रेडिओ जॉकीच्या नव्या भूमिकेत दाखल होत आहे. तिला या नव्या अंदाजात पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत. विद्या बालनने पहिल्यांदाच तिच्या बिग एफएमवरील कार्यक्रमासाठी गायलेला रॅप व्हिडिओ अखेर दाखल झाला आहे. या रॅप व्हिडिओमध्ये ही सुपरस्टार अभिनेत्री पहिल्यांदाच आत्मविश्वासाने रॅप गाताना दिसणार आहे.

२५ मार्चला सुरू झालेला हा कार्यक्रम रोज संध्याकाळी ७ ते ९ या वेळेत रेडिओवरून प्रसारित केला जातो. तर शनिवार-रविवारी संध्याकाळी ५ ते ९ या वेळेत त्याचे सर्व एचएसएमएसवरून पुन: प्रक्षेपण होते. या कार्यक्रमातील काही विशेष भाग ‘धुन बदल के तो देखो विथ विद्या बालन - स्पॉटलाइट’ याचे प्रक्षेपण सोमवार ते शुक्रवार दुपारी १ ते २ या वेळात केले जाणार आहे.

याबाबत आरजे विद्या बालन म्हणाली, मी अशी कल्पानाही केली नव्हती की, मी रॅप करेन. पण ‘धुन बदल के तो देखो’ या कार्यक्रमाच्या विषयाशी जुळवून घेताना मला वाटले की रॅप करणे उपयोगी ठरेल. या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्या-ज्या विषयांना वाचा फुटते आहे ते लक्षात घेता रॅप हाच यासाठी योग्य प्रकार आहे. ते करताना मला खूपच आनंद मिळाला आणिमला असे वाटते की, त्या व्हिडिओमध्ये माझा हा आनंद टिपला गेला आहे. त्याचबरोबर प्रत्येक जण त्या व्हिडिओशी जोडला जातो. आम्ही सगळ्यांनीच त्यात काम करताना आनंद लुटला.

अगदी त्या रॅपच्या व्हिडिओच्या चित्रीकरणाबाबतही म्हणाल तर हा तुमचा क्लासिकल रॅप व्हिडिओ नाही. तुम्ही काही ठिकाणी मला हसतानाही पहाल आणि मला आठवतेय की कुणीतरी त्यावर प्रतिक्रियाही दिली की, तू एकटीच हसणारी रॅपर आहेस. पण तीच मूळ कल्पना होती, बरोबर ना? ‘धुन बदल के तो देखो’, रॅप करा पण ते वेगळेपणाने, तुमच्या स्वत:च्या पद्धतीनेकरा. त्याला जरा वेगळे वळण द्या. मला विश्वास वाटतो की, जनतेला माझा हा नवा अवतार आवडेल आणि माझ्या या व्हिडिओला त्यांचे भरपूर प्रेम मिळेल, अशी आशा विद्या बालनने व्यक्त केली.

टॅग्स :विद्या बालन