Join us
Daily Top 2Weekly Top 5

"मनात चिंता ठेऊन जगणे..."; ८३ वर्षीय अमिताभ बच्चन यांनी लिहिलेली पोस्ट चर्चेत, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 10:44 IST

बिग बी सध्या 'कौन बनेगा करोडपती' शोचं सूत्रसंचालन करत आहेत. अशातच बिग बींनी केलेली पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे. काय म्हणाले बिग बी?

अमिताभ बच्चन हे बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेते. अमिताभ यांना आपण विविध सिनेमांमध्ये अभिनय करताना पाहिलंय. गेली अनेक वर्ष अमिताभ बॉलिवूडवर राज्य करत आहेत. वयाची ८० वर्ष ओलांडली असली तरीही आजही अमिताभ यांची एनर्जी थक्क करणारी आहे. बिग बी सध्या 'कौन बनेगा करोडपती' शोचं सूत्रसंचालन करत आहेत. अशातच बिग बींनी केलेली पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे. काय म्हणाले बिग बी?

कामाशिवायचा दिवस अस्वस्थ करणारा

अमिताभ लिहितात की, "आजचा संपूर्ण दिवस 'आळसाने' भरलेला होता... याचे कोणतेही खास कारण नव्हते... पण दररोज काम करण्याची सवय असताना, एखाद्या दिवशी काम नसेल तर ते थोडे विचित्र वाटते. जेव्हा तुम्ही रोजच्या ठराविक वेळापत्रकानुसार काम करत नाही, तेव्हा तुमची जी दैनंदिन सवय असते ती काहीशी बदलते. अशा वेळी तो दिवस अचानक एका कोड्यासारखा वाटू लागतो. कारण एरवी काम असल्याने तो दिवस सहज पार पडतो."

बिग बींनी पुढे म्हटले आहे की, "आपल्या मनात विचार येतो की, आजचा दिवस आपल्याला हवा तसा का जात नाहीये. पण जर आपल्यामध्ये ही गोष्ट समजण्याची क्षमता असेल तर आपल्या आजूबाजूला शांती आणि समाधान टिकून राहू शकते. मात्र, काही लोकांच्या बाबतीत असे कधीच होत नाही आणि यामुळे त्यांची चिंता अधिक वाढते. मनात चिंता ठेऊन जगणे हे मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी हानिकारक असते. त्यामुळे मानसिक रित्या खचून जाता मनात चिंता आणण्यात काहीच अर्थ नाहीये.''

English
हिंदी सारांश
Web Title : Amitabh Bachchan's post on living with worries sparks discussion.

Web Summary : Amitabh Bachchan reflects on the restlessness of idle days and the importance of peace. He emphasizes that dwelling on anxieties is detrimental to mental and physical well-being, urging a shift towards contentment.
टॅग्स :अमिताभ बच्चनबॉलिवूडटेलिव्हिजन