Join us
Daily Top 2Weekly Top 5

'स्टाइल' फेम साहिल खान वयाच्या 47 व्या वर्षी चढला बोहल्यावर; 21 वर्षीय पत्नीसोबत झाला रोमॅण्टिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2024 11:51 IST

Sahil khan: साहिलने 2003 मध्ये पहिलं लग्न केलं होतं. मात्र त्याचा संसार फार काळ टिकला नाही. अवघ्या दोन वर्षात ते विभक्त झाले.

'स्टाइल' आणि 'एक्सक्यूज' यांसारख्या गाजलेल्या सिनेमांच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे साहिल खान.  दमदार पर्सनालिटी आणि अभिनय यांच्या जोरावर साहिलने लोकप्रियता मिळवली. खासकरुन तरुणींमध्ये त्याची जास्त क्रेझ आहे. विशेष म्हणजे वयाच्या ४७ व्या वर्षी साहिलने दुसऱ्यांदा संसार थाटला आहे. इतकंच नाही तर त्याची बायको चक्क २१ वर्षांची आहे. 

सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या साहिल खान याने नुकताच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो त्याच्या दुसऱ्या पत्नीसोबत रोमॅण्टिक झाल्याचं दिसून येत आहे. साहिलने हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर तो सोशल मीडियावर कमालीचा व्हायरल झाला आहे.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये साहिल आणि त्याची पत्नी एका बोटीत बसून समुद्रात छान विहार करत आहेत. ''इथे मी आहे आणि सोबत माझी बेबी आहे. #OneLifeOneLove'', असा हॅशटॅग वापरत साहिलने हा व्हिडीओ शेअर केला आहे. साहिलच्या दुसऱ्या पत्नीविषयी नेटकऱ्य़ांना फारसं माहित नाही. किंबहुना साहिलने सुद्धा तिच्याविषयी भाष्य केलेलं नाही. त्यामुळे तिच्याविषयी जाणून घेण्यासाठी नेटकरी उत्सुक आहेत. मीडिया सूत्रांनुसार, साहिल ४७ वर्षांचा आहे. तर, त्याची दुसरी पत्नी २१ वर्षांची आहे.

कोण आहे साहिलची पहिली पत्नी

साहिलने २००३ मध्ये निगार खान हिच्यासोबत पहिलं लग्न केलं होतं. मात्र, त्यांचा संसार फार काळ टिकला नाही. २००५ मध्ये ते विभक्त झाले.

टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा