Join us

'3 Idiots' परत येणार? सिक्वलची गुपचूप तयारी; करिना म्हणाली, 'मला सांगितलंही नाही...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2023 13:24 IST

करिनाचा व्हिडिओ पाहून आता चाहतेही संभ्रमात पडले आहेत. खरंच 3 इडियट्सचा सिक्वल येणार का?

बॉलिवूड विश्वातून आली मोठी बातमी. सुपरहिट '३ इडियट्स' (3 Idiots) सिनेमाचा सिक्वल येणार. होय तुम्ही ऐकलं ते खरं आहे. अभिनेत्री करिना कपूरला (Kareena Kapoor) याची कोणी खबरच लागू दिली नाही म्हणून तिने चिडून इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे. आमिर (Amir Khan), आर माधवन (R Madhavan) आणि शर्मन जोशी (Sharman Joshi) तिघांनी मिळून ही गोष्ट लपवलीच कशी असं म्हणत तिने तक्रार केली आहे.

'3 इडियट्स' ही  2009 मध्ये आलेली सुपरहिट फिल्म होती. यातील 'व्हायरल', 'चतुर', 'रँचो', फुन्सुक, वांगडू, असे अनेक पात्र गाजले. सिनेमाने हसतखेळत शिक्षणव्यस्थेवर बोट ठेवलं. '3 इडियट्स'चा सिक्वेल येणार हे मला कसं सांगितलं नाही असं म्हणत अभिनेत्री करिना कपूर चिडली आहे. व्हिडिओ शेअर करत ती म्हणाली, 'मी सुट्टीवर असताना या तिघांचं (आमिर, शर्मन आणि माधवन) चं काहीतरी सुरु होतं. ती प्रेस कॉन्फरन्स... हे तिघंही काहीतरी सिक्रेट ठेवत आहेत. आणि हे शर्मनच्या सिनेमाचं प्रमोशन आहे असं तर अजिबातच सांगू नका. मला वाटतं ते सिक्वलचा विचार करत आहेत. मला सोडून? बोमनलाही याबद्दल माहित नाही वाटतं. त्याला फोन करते. नक्की चाललंय काय यार हे नक्कीच सिक्वलबद्दल असणार आहे.'

करिनाच्या व्हिडिओनंतर तिकडे बोमन इरानीही चिडले आहेत. virus शिवाय ३ इ़डियट्सचा सिक्वल कसा बनेल? नक्की चाललंय काय असं ते व्हिडिओत म्हणत आहेत.

हे व्हिडिओ पाहून आता चाहतेही संभ्रमात पडले आहेत. खरंच 3 इडियट्सचा सिक्वल येणार आहे का की हा फक्त एक प्रँक आहे हे लवकरच स्पष्ट होईल. राजकुमार हिरानी यांच्या '३ इडियट्स' सिनेमाने ५५ कोटींच्या बजेटमध्ये तब्बल ४०० कोटींची कमाई केली होती. काही दिवसांपूर्वीच राजकुमार हिरानी यांनी 3 इडियट्सच्या सिक्वलची घोषणा केली होती. सध्या सिक्वलच्या लिखाणाचे काम सुरु आहे असं ते म्हणाले होते. मात्र पुढे याबाबत काहीच समोर आले नाही. करिनाच्या आजच्या व्हिडिओनंतर पुन्हा चर्चांना उधाण आले आहे.

टॅग्स :करिना कपूरआमिर खानसिनेमा