Join us
Daily Top 2Weekly Top 5

'हा' सुप्रसिद्ध अभिनेता साकारणार श्री श्री रविशंकर यांची भूमिका, काय असणार सिनेमाची कहाणी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 14:10 IST

श्री श्री रविशंकर यांची भूमिका हा सुप्रसिद्ध अभिनेता साकारणार आहे. हा सिनेमा आंतरराष्ट्रीय स्तरावरील एक सिनेमा असणार आहे. सर्वांना या सिनेमाची उत्सुकता आहे

'आर्ट ऑफ लिव्हिंग' संस्थेचे संस्थापक श्री श्री रविशंकर (sri sri ravishankar) यांचे जगभरात अनुयायी आहेत. मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीपासून अनेक सेलिब्रिटीही श्री श्री रविशंकर यांना फॉलो करतात .  श्री श्री रविशंकर यांच्या कहाणीची पार्श्वभूमी असलेल्या एका आगामी सिनेमाची चर्चा आहे. 'व्हाईट' (white) असं या सिनेमाचं नाव असून बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता या सिनेमात श्री श्री रविशंकर यांची भूमिका साकारणार आहे. या अभिनेत्याने रविशंकर यांची भूमिका साकारण्यासाठी तयारीही सुरु केलीय.

हा अभिनेता साकारणार श्री श्री रविशंकर यांची भूमिका

बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेता विक्रांत मेस्सी 'व्हाईट' या सिनेमात आध्यात्मिक गुरु आणि 'आर्ट ऑफ लिव्हिंग' संस्थेचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांची भूमिका साकारणार आहे. वॉर, पठाण यांसारख्या सुपरहिट सिनेमांचं दिग्दर्शन करणारा सिद्धार्थ आनंद या सिनेमाच्या निर्मितीची धुरा सांभाळणार आहे. महावीर जैन यांच्यासोबत सिद्धार्थ या सिनेमाचा को-प्रोड्यूसर आहे. 'व्हाईट' सिनेमात कोलंबियामध्ये ५२ वर्षांपासून सुरु असलेलं नागरी युद्ध कसं मिटलं, याची कहाणी बघायला मिळणार आहे. कोलंबियामधील संघर्षमय वातावरणात भारतीय अध्यात्मिक तत्वज्ञानाने कशी मोलाची भूमिका पार पडली, याची कहाणी दिसणार आहे.

विक्रांतने सुरु केलीय भूमिकेची तयारी

विक्रांत मेस्सीने या भूमिकेसाठी विशेष तयारी सुरू केली आहे. त्याने अलीकडेच आपले केस वाढवले असून, तो स्वतःच्या शारीरिक बदलांवर आणि हावभावांवरही काम करत असल्याचं दिसतंय. चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. '12th Fail' आणि 'द साबरमती रिपोर्ट' मधील त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. आता 'व्हाईट' सिनेमामध्ये विक्रांत श्री श्री रविशंकर यांची भूमिका कशी साकारतोय, याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध जाहिरात दिग्दर्शक मोंटू बसी करणार आहेत, तर Peacecraft Pictures सहनिर्माते म्हणून सहभागी आहेत.

टॅग्स :विक्रांत मेसीबॉलिवूड