Join us
Daily Top 2Weekly Top 5

रंजक कथा आणि दमदार ट्विस्ट, 'या' लोकप्रिय वेबसीरिज करतील तुमचं भरपूर मनोरंजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2023 15:31 IST

सर्वाधिक लोकप्रिय भारतीय वेब सीरिजविषयी जाणून घेणार आहोत.

सोशल मीडियावर सध्या वेगवेगळ्या वेबसीरिज आणि चित्रपट यांची चर्चा आहे.  वर्षाचा शेवटचा महिना सुरू आहे आणि IMDB ने सर्वाधिक लोकप्रिय भारतीय वेबसीरिजची यादी जाहीर केली आहे. आपण अशाच सर्वाधिक लोकप्रिय भारतीय वेब सीरिजविषयी जाणून घेणार आहोत. ज्यांनी  टॉप 10 मध्ये आपले स्थान निर्माण केले आहे आणि त्या  प्रेक्षकांना आवर्जुन पाहायला हव्यात. 

'फर्जी'या यादीत पहिले नाव म्हणजे शाहिद कपूरची डेब्यू वेबसीरिज 'फर्जी' याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या थ्रिलरमध्ये  शाहिदसोबत विजय सेतुपतीही महत्त्वाच्या भूमिकेत आहे. ही वेबसीरिज तुम्ही Amazon Prime Video वर पाहू शकता.

'गन्स अँड गुलाब'राजकुमार रावची 'गन्स अँड गुलाब' ही क्राईम ड्रामा वेबसिरीज आहे. ज्यामध्ये राजकुमारसोबत दुल्कर सलमान, आदर्श गौरव, गुलशन देवय्या आणि टीजे भानू मुख्य भूमिकेत आहेत. नेटफ्लिक्सवर या क्राईम ड्रामा वेबसीरिजचा तुम्ही आनंद घेऊ शकता.

'नाईट मॅनेजर'या वर्षी डिस्ने प्लस हॉट स्टारवर प्रदर्शित झालेल्या 'नाईट मॅनेजर'चे दोन्ही सीझन प्रेक्षकांना आवडले. अनिल कपूर आणि आदित्य रॉय कपूर यांनी या वेबसिरीजद्वारे ओटीटीमध्ये पदार्पण केले आहे.

'कोहरा' बरुण सोबती आणि यामी गौतम यांच्या 'कोहरा' या वेबसिरीजचेही खूप कौतुक झाले. ही  वेबसीरिज Netflix वर उपलब्ध आहे.

'असुर २'सस्पेन्सने परिपुर्ण असलेली  'असुर २' ही या वर्षातील सर्वोत्कृष्ट वेबसीरिजपैकी एक ठरली आहे. अर्शद वारसी स्टारर या वेबसिरीजमधील सर्व कलाकारांनी अप्रतिम काम केले आहे. तुम्ही Jio सिनेमावर 'असुर २' पाहू शकता.

'राणा नायडू'साऊथचा सुपरस्टार राणा दग्गुबतीची वेबसीरिज 'राणा नायडू'ही ट्रेंडमध्ये राहिली. 'राणा नायडू' ही 'रे डोनोवन' या इंग्रजी वेबसीरिजचा अधिकृत हिंदी रिमेक असल्याची माहिती आहे. ज्याला समीक्षक आणि प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.

 'दहाड'सोनाक्षी सिंह आणि विजय वर्मा स्टारर वेबसीरिज 'दहाड'चेही खूप कौतुक झाले. ही वेबसीरिज तुम्ही प्राइम व्हिडीओवर पाहू शकता.

'सास बहू फ्लेमिंगो'स्त्री शक्तीची अद्भुत कहाणी 'सास बहू फ्लेमिंगो'मध्ये  दाखवण्यात आली आहे. या वेबसीरिजमधील डिंपल कपाडियाच्या उत्कृष्ट अभिनयाने लोकांची मने जिंकली. ही वेबसीरिज बघायलाच हवी. तुम्ही ते डिस्ने प्लस हॉटस्टारवर पाहू शकता.

'स्कूप'नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या हंसल मेहताच्या 'स्कूप' या वेबसिरीजनेही चाहत्यांना आपलेसे केले. 'स्कूप'मध्ये करिश्मा तन्ना मुख्य भूमिकेत आहे.  तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले आहे. 

'जुबली''जुबली' वेबसिरीजने रेट्रो युगाची कथा उत्कृष्ट पद्धतीने सादर केली आहे. तुम्ही ही वेबसिरीज प्राइम व्हिडीओवर पाहू शकता.

टॅग्स :वेबसीरिजबॉलिवूडसेलिब्रिटी