Join us

नव्या वर्षाची नवी सुरुवात! प्रसिद्ध गायक अरमान मलिकने गर्लफ्रेंडसोबत शाही थाटात बांधली लग्नगाठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 13:40 IST

प्रसिद्ध बॉलिवूड गायक अरमान मलिकने गर्लफ्रेंडसोबत शाही थाटात लग्न केलंय. कोण आहे अरमानची होणारी बायको? (armaan malik)

बॉलिवूडमध्ये लोकप्रिय गाणी गाणारा प्रसिद्ध गायक अरमान मलिकनेलग्न केलंय. गर्लफ्रेंड आशना श्रॉफसोबत अरमानने आज (२ जानेवारी) लग्नगाठ बांधली आहे. अरमानच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. अरमानच्या लग्नाचे फोटो समोर येताच सर्वांनी त्याचं अभिनंदन केलंय. अरमानची बायको ही प्रसिद्ध यूट्यूबर आणि ब्लॉगर आहे. अरमान मलिकच्या लग्नाचा शाही थाट त्याच्या चाहत्यांच्या पसंतीस पडलाय.

अरमान मलिकने बांधली लग्नगाठ

अरमानने त्याच्या सोशल मीडियावर लग्नाचे खास फोटो शेअर केलेत. अरमानने गेल्या वर्षी २०२४ मध्ये त्याची गर्लफ्रेंड आशना श्रॉफला लग्नाची मागणी घातली होती. त्यानंतर २३ ऑगस्ट २०२४ ला या दोघांनी एकमेकांसोबत साखरपुडा केला होता. त्यामुळे आता नवीन वर्षाच्या सुरुवातीला अरमान आणि आशनाने एकमेकांसोबत लग्नाचा मुहुर्त साधला. दोघांच्या लग्नाला नातेवाईक, मित्र-मैत्रिणींची उपस्थिती होती.

अरमानने लग्नात पीच रंगाची शेरवानी परिधान केली होती. तर आशनानेही अरमानच्या रंगाला साजेसी साडी नेसली होती. दोघंही एकमेकांना ट्युनिंग करणारे कपडे परिधान करताना दिसून आले. फोटोवर नजर मारल्यास अरमान-आशना एकमेकांसोबत लग्न करण्यास आणि वरमाला घालण्यास जास्त उत्सुक असल्याचं दिसतंय. दोघांनी पारंपरिक पद्धतीने विधिवत लग्न केलंय. अरमान बॉलिवूडमध्ये अनेक लोकप्रिय गाण्यांसाठी प्रसिद्ध आहे.

टॅग्स :अरमान मलिकलग्न