Join us
Daily Top 2Weekly Top 5

Video: पापाराझींवर संतापला शाहिद कपूर; डिनर डेटवर गेलेल्या कबीर सिंगच्या रागाचा झाला उद्रेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2024 11:04 IST

Shahid kapoor: अलिकडेच शाहिद पत्नी मीरा राजपूतसोबत रोमॅण्टिक डिनर डेटवर गेला होता.

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर (shahid kapoor) सध्या त्याच्या 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' या सिनेमामुळे चर्चेत येत आहे. या सिनेमाने बॉक्सवर चांगली कमाई केली आहे. त्यामुळे तो या सिनेमाचं सक्सेस एन्जॉय करत आहे. यामध्येच त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो पापाराझींवर संतापल्याचं दिसून येत आहे.

अलिकडेच शाहिद पत्नी मीरा राजपूतसोबत डिनर डेटवर गेला होता. त्यामुळे रेस्टॉरंटमधून बाहेर पडतांना त्याला आणि मीराला पाहिल्यावर पापाराझींनी त्यांचे फोटो काढण्यास सुरुवात केली. परंतु, पापाराझींनी त्याच्या भोवती जो गराडा घातला होता ते पाहून शाहिद चांगलाच चिडला आणि त्याने फोटोग्राफर्सला फटकारलं.

फोटो काढणाऱ्या पापाराझींवर शाहिद ओरडला आणि फोटो काढू नका असं त्याने सांगितलं. त्याचा हा व्हिडीओ पाहिल्यावर नेटकऱ्यांनी त्याच्यावर टीकास्त्र डागलं आहे. कबीर सिंगनंतर त्याच्या अॅटिट्यूडमध्ये बदल झाल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, डिनर डेटवर गेलेल्या शाहिद आणि मीराने ब्लॅक कलरचं ट्विनिंग केलं होतं. शाहिद लवकरच रोशन एंड्र्यूजच्या देवा या अॅक्शन थ्रिलर सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत अभिनेत्री पूजा हेगडे स्क्रीन शेअर करणार आहे.

टॅग्स :शाहिद कपूरबॉलिवूडमीरा राजपूतसेलिब्रिटीकबीर सिंग