Join us
Daily Top 2Weekly Top 5

बॉलिवूडमध्ये आजही गायक उपेक्षित, कामानुसार मोबदला मिळत नाही नेहा कक्करने समोर आणले चंदेरी दुनियेचं वास्वव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2020 11:29 IST

आठ महागड्या आलिशान कार आहेत. काही दिवसांपूर्वीच नेहाने मर्सिडीज खरेदी केली आहे. तिच्या या नवीन कारची किंमत 95.72 लाख आहे. नेहाची संपत्ती 51.80 कोटी एवढी आहे.

नेहा कक्करने एक से बढकर एक गाणी गात बॉलीवुमध्ये गायिका म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. नेहा आज बॉलिवूडच्या टॉप सिंगर्सपैकी एक आहे. ती गाण्याचे 10 ते 15 लाख रुपये मानधन घेते. एखाद्या सिनेमात तिला गाणे कंपोज करण्यासाठी घेतले गेले तर ती दोन ते तीन लाख रुपये महिन्याला घेते. 4 वर्षांची होती तेव्हापासूनच तिने संगीताचे धडे घेण्यस सुरुवात केली होती. तर जेव्हा नेहा 11वीमध्ये होती. तेव्हा ती कंटेस्टेंट म्हणून इंडियन आयडल या शो मध्ये गेली होती. या शोमध्ये ती त्यावेळी यश मिळवू शकली नाही. तिल रिजेक्ट करण्यात आलं होतं. 

नेहाने तिचा भाऊ टोनी कक्कड आणि बहीण सोनू कक्कड यांच्याकडून प्रशिक्षण घेतली. नेहा सुरुवातीला आपल्या भाऊ बहिणीसोबत जागरणमध्ये गायची. गायनातील यशामुळेच नेहा सध्या मुंबईच्या वर्सोवा येथील 3BHK अपार्टमेंटमध्ये राहते. ज्याची किंमत 1.2 कोटी रुपये आहे. नेहाकडे आठ महागड्या आलिशान कार आहेत. काही दिवसांपूर्वीच नेहाने मर्सिडीज खरेदी केली आहे. तिच्या या नवीन कारची किंमत 95.72 लाख आहे. नेहाची संपत्ती 51.80 कोटी एवढी आहे.

नेहा कक्करने तिच्या करिअरला घेऊन एक खुलासा केला आहे. नेहाच्या म्हणण्यानुसार गायकांना बॉलिवूडमधून कधीच समाधानकारक मानधन दिले जात नाही. त्यांना नेहमीच कमाईसाठी कॉन्सर्टवर अवलंबून राहावे लागते. जेव्हा एखाद्या गायकाचे गाणे प्रचंड गाजते आणि अचानक गायक प्रकाशझोतात येतो तेव्हाच त्याला कॉन्सर्टसारखी काम मिळतात. आणि हेच त्याचे कमाईचे साधन बनते. नेहाने म्हटले आहे की, बॉलिवूड गाणी गात तिने कधीच कमाई केली नाही. उलट बाहेर जे गाण्याचे कार्यक्रम होतात त्यातूनच तिने पैसा कमावला आहे.

टॅग्स :नेहा कक्कर