Join us

कपिल शर्मा पुन्हा अडकला वादात; संतप्त चाहत्यांनी सलमान खानलाही ओढलं, पाहा काय आहे कारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2022 09:43 IST

Kapil Sharma Controversy : कपिल शर्मा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. पाहा काय आहे त्यामागचं कारण. चाहतेही संतापले.

छोट्या पडद्यावरील स्टार कपिल शर्माचा (Kapil Sharma) वादांशी घनिष्ठ संबंध आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. सर्व काही ठीक चाललं असतानाही अचानक कपिल कोणत्या ना कोणत्या कारणानं वादाच्या भोवऱ्यात सापडतो. कपिल शर्मा शो बऱ्याच काळापासून लोकांचे मनोरंजन करत आहे आणि जगभरात लोकांच्या पसंतीसही उतरत आहे. परंतु अनेकदा या शो ला ट्रोलही करण्यात आलंय. आता पुन्हा एकदा हा शो लोकांच्या निशाण्यावर आहे. 

काश्मीर फाईल्स या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्रिहोत्री यांनी कपिल शर्मावर एक मोठा आरोप केला आहे. आपल्या या चित्रपटात कोणताही बडा कलाकार नसल्यामुळे कपिल शर्मानं आपल्या चित्रपटाचं प्रमोशन करण्यास नकार दिल्याचं विवेक अग्निहोत्रींनी म्हटलं. लोकांनीही विवेक अग्निहोत्री यांच्या या आरोपाला गंभीरतेनं घेतलं. तसंच कपिल शर्माला नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर (Social Media) ट्रोल करण्यासही सुरूवात केली. एका युझरनं विवेक अग्निहोत्री यांना आपल्या काश्मीर फाईल्स चित्रपटाचं प्रमोशन कपिल शर्मा शो मध्ये करण्याचं विनंती केली. तसंच त्यानं कपिल शर्मालाही ही विनंतरी केली. परंतु विवेक अग्निहोत्री यांनी यावर रिअॅक्ट करत कपिलवर आरोप केला. "कपिल शर्मा शो मध्ये कोणाला बोलावलं पाहिजे याचा निर्णय मी घेऊ शकत नाही. हा पूर्णपणे कपिल शर्मा शो च्या प्रोड्युसर्सवर अवलंबून आहे," असं विवक अग्निहोत्री यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं. तसंच त्यांनी बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांनी महात्मा गांधींनी सांगितलेल्या वक्तव्याचा उल्लेखही केला. यानंतर अनेक नेटकऱ्यांनी कपिल शर्मावर निशाणा साधला. तसंच बोलता बोलता त्यांनी कपिल शर्मा शो चा प्रोड्युसर सलमान खानवरही निशाणा साधला.

विवेक अग्निहोत्री यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी द काश्मीर फाइल्य या चित्रपटाला समर्थन केलं. याशिवाय अनेकांनी कपिल शर्मावर टीकाही केली. असं आम्हाला कपिल शर्माकडून अपेक्षा नव्हती असंही काही नेटकऱ्यांनी म्हटलं.

टॅग्स :कपिल शर्मा बॉलिवूड