Join us

'...तर फायदा काय'; मूल दत्तक घेण्याविषयी तब्बूने दिलं आश्चर्यकारक उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2023 17:42 IST

Tabu: लग्न न करता एकटं राहणाऱ्या तब्बूकडे आहे अमाप संपत्ती. मात्र, तरीदेखील तिने या संपत्तीचा वारसदार म्हणून मूल दत्तक घेण्यास नकार दिला.

बॉलिवूड अभिनेत्री तब्बू (Tabu) तिच्या प्रोफेशनल लाइफपेक्षा पर्सनल लाइफमुळे बऱ्याचदा चर्चेत येत असते. एका मुलाखतीत तब्बूनेअजय देवगणमुळे आजपर्यंत लग्न केलं नाही असं म्हटलं होतं. तिच्या या वक्तव्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली. यानंतर आता तब्बूने मूल दत्तक घेण्याविषयी भाष्य केलं आहे. मूल दत्तक घेण्याचा फायदा काय असं तब्बूने म्हटलं आहे.

आजवरच्या कारकिर्दीत तब्बूने बरीच लोकप्रियता, अमाप संपत्ती कमावली मात्र, अद्यापही तिने लग्न केलं नाही. या काळात तिचं नाव अनेक प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत जोडलं गेलं. परंतु, त्यांच्यापैकी कोणासोबतही तिने लग्न केलं नाही. त्यामुळेच आज ती एकटं जीवन जगत आहे. विशेष म्हणजे तब्बू आज कोटयवधी संपत्तीची मालकीण आहे.मात्र, तिच्या पश्चात या संपत्तीचा वारसदार कोण असा प्रश्न अनेकांना पडतो. याचं उत्तर तिने एका मुलाखतीत दिलं आहे.

"मला मूल दत्तक घ्यायचं असतं तर मी कधीच घेतलं असतं. पण, जर त्याला आई आणि वडील असं दोघांचं प्रेम मिळणार नसेल. तर, मूल दत्तक घेऊन काय फायदा", असं तब्बू म्हणाली. तिच्या या उत्तराने चाहते हैराण झाले.

दरम्यान, बॉलिवूडसह साऊथमध्ये काम केलेल्या तब्बूचा ‘भोला’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत  अजय देवगण मुख्य भूमिकेत झळकणार आहे. सध्या सर्वत्र भोला सिनेमाची चर्चा रंगत आहे. सिनेमात तब्बू पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत झळकणार आहे. 

टॅग्स :तब्बूबॉलिवूडसेलिब्रिटीअजय देवगण