Swara Bhaskar: बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर ही तिच्या चित्रपटांइतकीच ती तिच्या परखड आणि स्पष्ट वक्तेपणासाठी ती ओळखली जाते.अभिनेत्रीने अनेकदा सोशल मीडियावर तिच्या पोस्ट्समुळे देखील चर्चेत असते. सध्या स्वरा भास्कर आणि तिचा पती कलर्स वाहिनीवरील 'पती पत्नी और पंगा' या टीव्ही शोमध्ये सहभागी झाले आहेत. यामध्ये बरीच सेलिब्रिटी जोडपी देखील पाहायला मिळतायत. त्यादरम्यानचे वाद, एकमेकांवरील प्रेम पाहून चाहते देखील कौतुक करत आहेत. अशातच याचनिमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत स्वराने केलेल्या वक्तव्याची आता सगळीकडे चर्चा रंगली आहे.
स्वराने २०२३ मध्ये फहाद अहमदशी लग्न केलं आणि आता ती एका मुलीची आई आहे. तिची मुलगी जन्मानंतर अभिनेत्रीचं वाढलेलं वजन आणि बदललेला लूक पाहून सोशल मीडियावर अनेकदा नकारात्मक प्रतिक्रिया आल्या. असंही ती म्हणाली. यावर स्वराने या मुलाखतीमध्ये भाष्य करत ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.' फिल्मीग्यान'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये स्वरा भास्कर नाराजी व्यक्त करत म्हणाली," मी एक मुलीची आई आहे. त्यामुळे मला ३५ व्या वर्षी तशी स्लिम ट्रिम, ग्लॅमरस दिसण्याची कोणतीही हौस नाही. आता ते शक्य नाही कारण, मी काही पंचवीशीची राहिलेले नाही. मला २५ वर्षांची असल्यासारखं दिसाण्याची गरज वाटत नाही."
त्यानंतर पुढे स्वरा म्हणाली, "सुरुवातीच्या काळात बाळाच्या जन्मानंतर तुम्ही खूप संवेदनशील असता.तुमची मानसिक स्थिती थोडी कमजोर असते.प्रत्येक गोष्टीचा तुमच्यावर परिणाम होत असतो. त्यादरम्यान जे ट्रोलिंग केलं गेलं त्यामुळे मला खूप वाईट वाटायचं. मला कळतच नव्हतं की,या गोष्टींवर का बोलत आहेत.गरोदरपणानंतर वजन वाढणं ही सामान्य गोष्ट आहे."
ट्रोल करणाऱ्यांना स्वराचं सडेतोड उत्तर...
यापुढे अभिनेत्रीने म्हटलं," आता मला या सगळ्याचा काही फरक पडत नाही. मला समजलंय, की मूर्ख लोकांचं तुम्ही काहीच करू शकत नाही.ज्यांच्या डोक्यात कचरा आहे, तो व्यक्ती सर्वांना कचराच दाखवणार आहे." असं म्हणत अभिनेत्रीने ट्रोलर्सना चांगलच झापलं आहे.