अभिनेत्री स्वरा भास्कर ही सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. स्वराने बॉलिवूडमध्ये विविध सिनेमांत काम केलंय. 'तनू वेड्स मनू', 'नील बटे सन्नाटा', 'तनू वेड्स मनू रिटर्न', 'रांझणा' अशा सिनेमांत स्वराने अभिनय केला. स्वराने २०२३ मध्ये फहाद अहमदसोबत लग्न केलं. स्वरा सध्या मात्र एका वेगळ्याच कारणांनी ट्रोल होतेय. स्वरा काही दिवसांपूर्वी मौलाना सज्जद नौमानी यांना भेटायला गेली होती. त्यावेळी स्वराने परिधान केलेल्या कपड्यांमुळे तिला ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं. आता स्वराने ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिलंय.
स्वरा भास्करचं ट्रोलर्सना रोखठोक उत्तर
स्वरा भास्करने तिला ज्या लोकांनी ट्रोल केलं तो फोटो पोस्ट करुन लिहिलंय की, "मला या गोष्टीची कल्पना नव्हती की मी जे कपडे परिधान करण्याचा निर्णय घेते त्यावर लोक सोशल मीडियावर इतकी चर्चा करतील. हे खूप विचित्र आहे. मी इथे लग्नानंतरचे माझे आणखी फोटो पोस्ट करतेय. हे फोटो पाहून संघी किड्यांना शेणासाठी आणखी चारा मिळेल. मला खंत आहे की, फहाद अहमद हा एक परंपरावादी मुस्लिम पतीच्या चौकटीत फिट बसत नाही."
स्वरा भास्करला लोकांनी का ट्रोल केलं?
झालं असं की, काही दिवसांपूर्वी स्वरा भास्करने मौलाना सज्जाद नोमानी यांची भेट घेतली. यावेळी स्वरासोबत तिचा नवरा फहाद अहमदही होता. त्यावेळी स्वराने जो पेहराव परिधान केला होतो त्यावर नेटकऱ्यांनी तिची खिल्ली उडवत तिला ट्रोल केलं. "लग्नानंतर स्वरा किती बदललीय", "तिच्या कपडे परिधान करण्यामध्येही किती बदल झालाय", अशा कमेंट्स करुन लोकांनी स्वराला ट्रोल केलं होतं. अखेर या ट्रोलर्सना स्वराने सडेतोड उत्तर देऊन सर्वांची बोलती बंद केलीय.