Join us
Daily Top 2Weekly Top 5

बर्थडे स्पेशल: मिस युनिव्हर्स ते दोन मॉडेलला एकाचवेळी डेट करणे, असा आहे लारा दत्ताचा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2018 15:10 IST

आता भलेही ती जास्त सिनेमांमध्ये दिसत नसली तरी ती नेहमीच चर्चेट असते. चला जाणून घेऊया लाराबद्दलच्या काही खास गोष्टी... 

बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्ता आज आपला 40वा वाढदिवस साजरा करत आहे. उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद मध्ये लाराचा जन्म झाला होता. 2000 साली मिस यूनिव्हर्सचा किताब मिळवणा-या लाराचे वडील पंजाबी तर आई अॅंग्लो इंडियन आहेत. आता भलेही ती जास्त सिनेमांमध्ये दिसत नसली तरी ती नेहमीच चर्चेत असते. चला जाणून घेऊया लाराबद्दलच्या काही खास गोष्टी... 

दोघांना एकत्र करत होती डेट

करिअरच्या सुरुवातीच्या काळात लाराचं नाव अनेकांसोबत जोडलं गेलं. केली दोरजी पासून ते दीनो मोरियापर्यंत आणि टायगर वुड्स ते महेश भूपतीपर्यंत लाराचं नाव जोडलं गेलं. लाराचं लव्ह लाईफ नेहमीच वादात राहिलं. लारा ही सुरुवातीला मॉडल आणि अभिनेता केली दोरजीला डेट करत होती. नंतर मिस युनिव्हर्स झाल्यावर लाराने जाहीरपणे आपलं रिलेशनशीप स्विकारलं. दोघेही लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते. फिल्मी बीट च्या रिपोर्टनुसार, लारा केलीसोबत रिलेशनशीपमध्ये असूनही मॉडल दीनो मारियाला डेट करत होती. 

'त्या' उत्तराने लारा झाली मिस युनिव्हर्स

मिस युनिव्हर्स स्पर्धेच्या फायनलमध्ये एका उत्तराने लाराला हा किताब मिळवून दिला होता. 'मला वाटतं की,  मिस युनिव्हर्ससारख्या स्पर्धा आम्हा तरुण महिलांना ज्या क्षेत्रात पुढे जायचे आहे. त्याची सुरुवात करण्याची संधी देतं. मग तो उद्योग असो वा राजकारण असो. ही स्पर्धा आम्हाला आमची आवड आणि आमचं मत मांडण्याची संधी देतं. आम्हाला मजबूत बनवतो, स्वतंत्र बनवतो, जसे आम्ही आहोत'.

अक्षयने वाचवला होता जीव

असे म्हणतात की, लाराला तिचं नवं जीवन हे अक्षय कुमारने दिलं होतं. अंदाज सिनेमाचं शूटिंग करताना लारा पाण्यात बुडाली होती. त्यावेळी अक्षय कुमारने तिचा जीव वाचवला होता. तेव्हापासून लारा आणि अक्षय बॉलिवूडमधील सर्वात चांगल्या मित्रांपैकी मानले जातात.

हा होता पहिला सिनेमा

अनेकांना असं वाटतं की, लाराचा पहिला सिनेमा हा अंदाज होता. पण तसं नाहीये. लाराचा पहिला सिनेमा एक तमिळ सिनेमा होता. हा सिनेमा तिने आधी साईन केला होता. अरासात्ची असं त्या तमिळ सिनेमाचं नाव आहे. पण हा सिनेमा उशिरा रिलीज झाला होता. 

टॅग्स :बॉलिवूडलारा दत्ता