Join us
Daily Top 2Weekly Top 5

'या तीन गोष्टींशिवाय रात्री झोपच लागत नाही';करीनाने शेअर केलं बेडरुम सिक्रेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2021 17:33 IST

Kareena kapoor: अलिकडेच करीनाने ‘स्टार व्हर्सेस फूड’ या शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिने तिच्या जीवनातील अनेक गोष्टींचा खुलासा केला. त्यातच तिने तिचे बेडरुम सिक्रेट्सही शेअर केले.

ठळक मुद्देकरीनाचं बेडरुम सिक्रेट ऐकल्यावर अनेकांना हसू अनावर झालं. 

बॉलिवूडची बेबो अर्थात अभिनेत्री करीना कपूर खान कायमच चाहत्यांमध्ये चर्चेत असते. कधी तिच्या चित्रपटांमुळे तर कधी तिच्या पर्सनल लाइफमुळे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून करीना तिच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. अलिकडेच झालेल्या एका मुलाखतीत करीनाने तिचं बेडरुम सिक्रेड सर्वांसमोर सांगितलं आहे. इतकंच नाही तर दररोज रात्री झोपण्यापूर्वी या तीन गोष्टी तिच्यासोबत असणं अत्यंत गरजेचं आहे, असंही ती या मुलाखतीत म्हणाली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर करीनाची जोरदार चर्चा रंगली आहे. 

अलिकडेच करीनाने ‘स्टार व्हर्सेस फूड’ या शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिने तिच्या जीवनातील अनेक गोष्टींचा खुलासा केला. त्यातच तिने तिचे बेडरुम सिक्रेट्सही शेअर केले.

रात्रीस खेळ चाले: शेवंतापेक्षा कमी नाही तिची लेक; पाहा सुशल्याचा बोल्ड अवतार

"मला झोपण्यापूर्वी सैफ, वाइनची बाटली आणि माझा पायजमा ( नाईट सूट) या तीन गोष्टी कायम डोळ्यासमोर लागतात. या तीन गोष्टींशिवाय मला रात्री झोप येऊच शकत नाही", असं करीना यावेळी म्हणाली. विशेष म्हणजे तिचं हे बेडरुम सिक्रेट ऐकल्यावर अनेकांना हसू अनावर झालं. 

दरम्यान, करीना कायमच प्रत्येक गोष्टीवर उघडपणे व्यक्त होत असते. यापूर्वीदेखील तिने अनेक मुलाखतींमध्ये वैयक्तिक तसंच कलाविश्वातील काही घटनांवर उघडपणे मत मांडलेली आहेत. 

टॅग्स :करिना कपूरसैफ अली खान तैमुरबॉलिवूडसेलिब्रिटी