Join us
Daily Top 2Weekly Top 5

सगळे थिएटर रिकामी! 'जिगरा' बघायला गेलेल्या अभिनेत्रीचे आलियावर आरोप, म्हणाली- "तिने स्वत:च तिकिटं खरेदी करून..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2024 15:19 IST

'जिगरा' सिनेमाने दोनच दिवसांत ११.५६ कोटींचा गल्ला जमवला आहे. पण, हे बॉक्स ऑफिस कलेक्शन फेक असून आलियाने स्वत:च तिकिटं खरेदी केल्याचा गंभीर आरोप बॉलिवूड अभिनेत्रीने केला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट तिच्या 'जिगरा' या सिनेमामुळे चर्चेत आहे. आलिया आणि वेदांग रैना या सिनेमात मुख्य भूमिकेत असून भाऊ बहिणीच्या नात्यावर हा सिनेमा आधारित आहे. ११ ऑक्टोबरला  सिनेमा प्रदर्शित झालेला हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. बॉक्स ऑफिसवरही आलियाचा 'जिगरा' सिनेमा चांगली कमाई करत आहे. या सिनेमाने दोनच दिवसांत ११.५६ कोटींचा गल्ला जमवला आहे. पण, हे बॉक्स ऑफिस कलेक्शन फेक असून आलियाने स्वत:च तिकिटं खरेदी केल्याचा गंभीर आरोप बॉलिवूड अभिनेत्रीने केला आहे. 

बॉलिवूड अभिनेत्री दिव्या खोसलाने नुकतंच आलिया 'जिगरा' सिनेमा थिएटरमध्ये जाऊन पाहिला. हा सिनेमा पाहिल्यानंतर दिव्याने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर केली आहे. सिनेमागृहातील फोटो दिव्याने शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत ती म्हणते, "जिगरा सिनेमा बघायला मी सिटी मॉलमधील PVR मध्ये गेले होते. थिएटर पूर्ण रिकामी होते. सगळे थिएटर रिकामे आहेत. आलिया भटमध्ये खरंच जिगरा आहे. स्वत:च तिकीटं खरेदी करून फेक कलेक्शन दाखवलं आहे. याबाबत सगळे शांत का आहेत". या पोस्टमधून दिव्याने आलियावर आरोप केले आहेत. तिच्या या पोस्टने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. 

दरम्यान, आलियाच्या 'जिगरा' सिनेमाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर ४ कोटी ५५ लाखांचा गल्ला जमवला. तर दुसऱ्या दिवशी ६.५५ कोटींची कमाई केली. आता रविवारी हा सिनेमा किती कमाई करेल, हे पाहावं लागेल. 'जिगरा' सिनेमात परदेशातील तुरुंगात कैद असलेल्या आपल्या भावाला सोडवण्यासाठी बहीण कोणत्याही थराला जाऊ शकते अशी ही गोष्ट आहे. आलिया भटने सिनेमात 'सत्या' ही भूमिका साकारली आहे तर अभिनेता वैदांग रैनाने तिच्या भावाची 'अंकुर'ची भूमिका साकारली आहे. 

टॅग्स :आलिया भटदिव्या कुमारसेलिब्रिटीसिनेमा