Disha Patani: साऊथ स्टार सूर्या (surya) आणि बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल (Bobby Deol) मुख्य भूमिकेत असलेल्या 'कंगुवा' (Kanguva) चित्रपटामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आज १४ नोव्हेंबरच्या दिवशी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. सध्या सिनेविश्वात या बिग बजेट 'कंगुवा' सिनेमाची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. चित्रपटासाठी वापरण्यात आलेलं व्हीएफएक्स तसेच अॅक्शन सीक्वेंस प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा आहे.अशातच मनोरंजनविश्वात या चित्रपटापेक्षा त्यातील गाण्याने सिनेरसिकांचं लक्ष वेधलं आहे. या गाण्यासाठी अभिनेत्री दिशा पाटनीला (Disha Patani) २१ वेळा तिचा कॉस्च्यूम बदलावा लागला होता.
नुकतीच अभिनेत्री दिशा पाटनीने 'टाइम्स ऑफ इंडिया'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने 'कंगुवा'मधील येलो गाण्याच्या शूटिंग दरम्यानचा किस्सा शेअर केला. त्यादरम्यान दिशाने तिला या चित्रपटातील गाण्याचं शूट करताना खूप मजा आली असं सांगितलं. शिवाय 'योलो' गाण्याचं शूट करताना तिला चक्क २१ वेळा कपडे बदलावे लागले, असा खुलासाही तिने केला. शिवाय सिनेमाचं शूट भारताशिवाय ७ वेगवेगळ्या देशात झालं आहे, त्यामुळे या गाण्याच्या चित्रीकरणाला ४ दिवस लागले होते.
दरम्यान, अभिनेत्रीने मुलाखतीमध्ये साऊथ स्टार सूर्यासोबत काम करताना आलेला अनुभवही कथन केला. सूर्या एक उत्तम अभिनेता आहे. त्याच्यामध्ये खूपच एनर्जी आहे. शिवाय सूर्यासोबत डान्स करणं म्हणजे धमालच होती. त्यासोबतच दिशा पाटनीने चित्रपटात तिला काम करण्याची संधी दिल्याने दिग्दर्शक शिवा यांचे आभार देखील मानले.
'कंगुवा' या वर्षातील सर्वात बिग बजेट सिनेमांपैकी एक आहे. ३५० कोटींच्या बजेटमध्ये सिनेमा तयार झाला आहे. सूर्या, बॉबी देओल, दिशा पटानी यांची सिनेमात मुख्य भूमिका आहे. के.ई. ज्ञानवेल राजा यांनी सिनेमाची निर्मिती केली आहे. हा तमिळ पीरियड ड्रामा आहे जो १० भाषांमध्ये रिलीज होणार आहे. ३डी मध्येही सिनेमा पाहता येणार आहे.