Join us

VIDEO: 'स्काय फोर्स' मधील भूमिकेसाठी वीर पहारियाने घेतली तगडी मेहनत; होतंय कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 14:33 IST

सध्या मनोरंजनविश्वात 'स्काय फोर्स' या देशभक्तीपर चित्रपटाची जोरदार चर्चा आहे.

Veer Pahariya: सध्या मनोरंजनविश्वात 'स्काय फोर्स' या देशभक्तीपर चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. २४ जानेवारी २०२५ ला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू वीर पहारियाने (Veer Paharuya) 'स्काय फोर्स' मधून बॉलीवूड पदार्पण केलं आहे. याशिवाय बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच अभिनेता अक्षय कुमारने(Akshay Kumar) सुद्धा स्काय फोर्समध्ये महत्वाच्या भूमिकेत दिसतो आहे. 'स्काय फोर्स' सिनेमात इंडियन एअर फोर्समधील अजमादा बोपय्या देवय्या या धाडसी अधिकाऱ्याची शौर्यगाथा रुपेरी पडद्यावर दाखवण्यात आली आहे. या सिनेमात वीर पहारियाने देवय्या यांची भूमिका साकारली आहे. ही भूमिका त्यान उत्तमरित्या वठवली. दरम्यान, या भूमिकेसाठी त्याने प्रचंड मेहनत घेतली. याचा प्रत्यय त्याने शेअर केलेल्या व्हिडीओमधून येत आहे.

नुकताच सोशल मीडियावर वीर पहारियाने स्काय फोर्स दरम्यान घेतलेल्या ट्रेनिंगचा खास व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्याने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये वीर कधी पुल-अप तर कधी पुश-अप करताना दिसत आहेत. याशिवाय जबरदस्त बीचवर धावताना आणि कधी वर्कआउट करताना दिसतोय. अभिनेत्याची ही मेहनत पाहून चाहत्यांनी त्याचं तोंडभरून कौतुक केलं आहे.

'स्काय फोर्स' सिनेमा १९६५ च्या भारत-पाकिस्तान हवाई युद्धादरम्यान पाकिस्तानच्या सरगोधा एअरबेसवर भारताने केलेल्या हवाई हल्ल्यावर आधारित आहे. सध्या हिंदी सिनेसृष्टीत या चित्रपटाबद्दल चर्चा आहे. शिवाय २०२५ मधील हा सर्वाधिक ओपनिंग करणारा सिनेमा ठरला आहे. अक्षय कुमार आणि वीरसह सिनेमात सारा अली खान, निम्रत कौर, बोगुमिला बुबैक हे कलाकार सुद्धा पाहायला मिळत आहेत. 

टॅग्स :अक्षय कुमारबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमासोशल मीडिया