Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2024 11:16 IST

Sushant singh rajput: दिशाच्या निधनानंतर सुशांतच्या मनात काही व्यक्तींविषयी भीती निर्माण झाली होती, असंही तिने या मुलाखतीमध्ये म्हटलं आहे.

दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (sushant singh rajput) याचं निधन होऊन आता ३ ते ४ वर्षांचा काळ उलटला आहे. मात्र, अद्यापही त्याच्या मृत्यूचं गुढ कायम आहे. या मधल्या काळात सुशांतच्या बहिणीने श्वेता त्याला न्याय मिळावा यासाठी बरेच प्रयत्न केले. इतंकच नाही तर अनेक गोष्टींचा खुलासाही केला. यामध्येच तिने एक मोठा खुलासा केला आहे. तिच्या या खुलाशामुळे सुशांतच्या मृत्युविषयी एक मोठी माहिती समोर आली आहे.

अलिकडेच श्वेताने 'रणवीर इलाहाबादिया'ला एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने सुशांतच्या खोलीचा दरवाजा, घराजवळील सीसीटीव्ही कॅमेरा, घराच्या चाव्या यांच्याविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.  सोबतच दिशाच्या निधनानंतर सुशांतच्या मनात काही व्यक्तींविषयी भीती निर्माण झाली होती, असंही तिने या मुलाखतीमध्ये म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाली श्वेता?

"दिशा सॅलियनच्या निधनानंतर सुशांत कायम अस्वस्थ असायचा. ते लोक मलादेखील सोडणार नाही, असं सुद्धा त्याने मला सांगितलं होतं. त्या दिवशी सुशांतच्या अपार्टमेंटचे कॅमेरा बंद होते. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरा सुद्धा बंद होते. ते कॅमेरा तेव्हाच का बंद होते? असा प्रश्न उपस्थित करत श्वेताने मोठा खुलासा केला आहे.

पुढे ती म्हणते, "सुशांत त्याच्या खोलीचा दरवाजा कधीच बंद करायचा नाही. पण, त्या दिवशीच त्याच्या बेडरुमचा दरवाजा बंद होता. जेव्हा आपण अपार्टमेंट सोडतो तेव्हा चाव्या परत करायच्या असतात. पण, तेव्हा फक्त सुशांतच्या खोलीची चावी गायब होती."

दरम्यान, श्वेताने यापूर्वीही सुशांतच्या मृत्युविषयी अनेक खुलासे केले आहेत. सुशांतचं २०२० मध्ये निधन झालं. तेव्हापासून त्याचे कुटुंबीय न्याय मिळण्याच्या प्रतिक्षेत आहेत.

टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटीसुशांत सिंग रजपूतसिनेमा