Join us

'मी खात्री देतो तुमची मुलगी...'; सोनू सूद आंध्र प्रदेशातील गरीब मुलीच्या शिक्षणाचं स्वप्न करणार पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2024 13:41 IST

सोनू सुदने आंध्र प्रदेशातील एका गरीब घरच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्याचं कौतुक होतंय (sonu sood)

सोनू सूद हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता. सोनू सूद विविध कारणांमुळे बॉलिवूडमध्ये चर्चेत असतो. सोनूने लॉकडाऊनच्या काळात गरीब मजुरांना त्यांच्या गावी परतण्यासाठी मदत केली होती. सोनूने केलेल्या मदतीमुळे अनेकांना त्यांच्या घरी परतण्यास मदत झाली. सोनू अनेकदा लोकांना मदत करताना दिसतो. सोनूने पुन्हा एकदा त्याच्या कृतीने मन जिंकलंय. सोनूने एका गरीब मुलीच्या शिक्षणाचं स्वप्न पूर्ण करण्याचा निर्णय घेतलाय. 

सोनूने घेतली गरीब मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी

झालं असं की, आंध्र प्रदेशातील एका गरीब घरातील मुलीला तिचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी एका सोशल मीडिया युजरने लोकांना मदतीचं आवाहन केलं. या सोशल मीडिया पोस्टमध्ये एक मुलगी तिच्या आई-वडिलांसोबत दिसत आहे. पोस्टमध्ये लिहिले होते, "ती खूप गरीब आहे आणि तिला बीएससीचा अभ्यास करायचा आहे. सोनू सर तुम्ही काहीही करू शकता. कृपया या मुलीला मदत करा." पोस्टच्या उत्तरात सूदने लिहिले की, "तिला तिच्या आवडीच्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळेल याची मी खात्री देतो." अशाप्रकारे सोनूने मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली. 

सोनू सूदचं वर्कफ्रंट

सध्या सोनू सूद त्याचा आगामी महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट 'फतेह' मध्ये व्यस्त आहे. हा सिनेमा या वर्षी प्रदर्शित होणार आहे. सोनू सूद सिनेमात मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह सिनेमात हॅकरच्या भूमिकेत असल्याचे सांगितले जाते. याशिवाय जॅकलीन फर्नांडिसही या सिनेमात महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. खास गोष्ट म्हणजे सोनू सूद या सिनेमाच्या निमित्ताने दिग्दर्शनात पदार्पण करतोय.

टॅग्स :सोनू सूद