Join us
Daily Top 2Weekly Top 5

"मन उधाण वाऱ्याचे...", बॉलिवूड अभिनेत्याने गायलं मराठी गाणं, व्हिडीओ पाहून चाहते थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 09:52 IST

एका बॉलिवूड अभिनेत्याने त्याच्या चाहत्यांना मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा देताना खास सरप्राइज दिलं. बॉलिवूड अभिनेत्याने चक्क मराठी गाणं गात चाहत्यांना थक्क केलं आहे. 

२७ फेब्रुवारीला मराठी भाषा दिन संपूर्ण राज्यात मोठ्या उत्साहाने साजरा केला गेला. ठिकठिकाणी मराठी भाषा दिनानिमित्त अनेक कार्यक्रम राबवले गेले. अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावरुन चाहत्यांना मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या. एका बॉलिवूड अभिनेत्याने त्याच्या चाहत्यांना मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा देताना खास सरप्राइज दिलं. बॉलिवूड अभिनेत्याने चक्क मराठी गाणं गात चाहत्यांना थक्क केलं आहे. 

अभिनेता शरीब हाश्मीने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्याने अगं बाई अरेच्चामधील मन उधाण वाऱ्याचे हे गाणं गायल्याचं व्हिडीओत दिसत आहे. अगदी तालासुरात शरीब हे गाणं गाताना दिसत आहे. शरीबचं मराठी गाणं ऐकून चाहतेही आश्चर्यचकित झाले आहेत. हा व्हिडीओ शेअर करत तो म्हणतो, "पोस्ट करायला उशीर झाला पण , भावना त्याच आहेत. समजून घ्या. मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा". शरीबच्या या व्हिडीओवर कमेंट करत चाहत्यांनी त्याचं कौतुक केलं आहे. 

शरीब हा हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने अनेक सिनेमा आणि वेब सीरिजमध्ये काम केलं आहे. 'द फॅमिली मॅन' या सीरिजने त्याला लोकप्रियता मिळवून दिली. 'जरा हटके जरा बचके', 'मिशन मंजू', 'जब तक है जान', 'धाकड' अशा सिनेमांमध्ये त्याने काम केलं आहे. तर 'असुर', 'द ग्रेट इंडियन मर्डर', 'स्कॅम १९९२' या वेब सीरिजमध्ये तो झळकला. 

English
हिंदी सारांश
Web Title : Bollywood Actor Sings Marathi Song, Fans Amazed by Viral Video

Web Summary : Bollywood actor Sharib Hashmi surprised fans by singing a Marathi song on Marathi Language Day. His rendition of "Man Udhaan Varyache" went viral, with fans praising his effort and fluency. Hashmi shared the video on Instagram, expressing his love for the Marathi language.
टॅग्स :मराठी भाषा दिनबॉलिवूडसेलिब्रिटी