Join us
Daily Top 2Weekly Top 5

जगाचा निरोप घेण्यापूर्वी शेवटची इच्छा काय असेल? शाहरुख खान म्हणाला- "मला अखेरच्या श्वासापर्यंत..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2024 11:38 IST

शाहरुख खान हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता असून त्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी त्याला शेवटी काय करायला आवडेल हे सांगितलं आहे

शाहरुख खान हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता. शाहरुख आज ५८ वर्षांचा असला तरीही त्याचा बॉलिवूडमधील दरारा अजूनही कायम आहे. शाहरुखने २०२३ वर्ष 'पठाण', 'जवान' आणि 'डंकी' या सिनेमातून खऱ्या अर्थाने गाजवलं. या तिनही सिनेमांना शाहरुखच्या चाहत्यांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला. शाहरुख अजूनही विविध सिनेमांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. नुकत्याच एका मुलाखतीत शाहरुखने त्याची शेवटची इच्छा काय असेल, याचा उलगडा केलाय.

ही आहे शाहरुखची शेवटची इच्छा

शाहरुख खानला काही दिवसांपूर्वी प्रतिष्ठेच्या अशा लोकार्नो फिल्म फेस्टिव्हलमध्ये सन्मानित करण्यात आलं. त्यावेळी शाहरुखने त्याची शेवटची इच्छा बोलून दाखवली. शाहरुख म्हणाला, "मी कायम अभिनय करेल का? याचं उत्तर हो. मी जोवर मरत नाही तोवर माझं स्वप्न आहे की कोणीतरी अ‍ॅक्शन म्हणावं आणि मग मी मरावं. जेव्हा ते कट म्हणतील तेव्हा मी उठणार नाही. तेव्हा कोणीतरी सांगेल की, सीन झालाय तुम्ही आता उठू शकता. त्यावेळी मी म्हणेल, जोवर तुम्ही ओके म्हणत नाही तोवर मी उठणार नाही. मी शेवटच्या श्वासापर्यंत अभिनय करणं पसंत करेन."

शाहरुख खानचं वर्कफ्रंट

शाहरुख खानच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर २०२३ मध्ये 'पठाण', 'जवान', 'डंकी' हे सलग तीन ब्लॉकबस्टर सिनेमे शाहरुख खानने दिले. त्यानंतर यावर्षी शाहरुखचा एकही सिनेमा रिलीज होणार नाही. अलीकडेच शाहरुख त्याच्या खास शैलीत IIFA पुरस्कार सोहळा होस्ट करताना दिसला. सध्या शाहरुख आगामी 'किंग' सिनेमाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात शाहरुखसोबत त्याची लाडकी लेक सुहाना खानही झळकणार आहे.

टॅग्स :शाहरुख खानबॉलिवूडसुहाना खान