Join us
Daily Top 2Weekly Top 5

"माझ्याकडे खरंच पैसे नाहीत...", तिहार तुरुंगात सरेंडर होण्यापूर्वी राजपाल यादवचं भावुक वक्तव्य, चाहते हळहळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 14:03 IST

"काय करू सर? माझ्याकडे पैसेच नाही...", आत्मसमर्पण करण्यापूर्वी राजपाल यादव अधिकांऱ्यासमोर झाला भावुक, काय घडलं?

Rajpal Yadav: अभिनेता राजपाल यादव  हे नाव सिनेरसिकांसाठी काही नवं नाही. राजपाल यादवने जवळपास २० वर्षांहून अधिक काळ इंडस्ट्रीत सक्रिय आहे. आपल्या विनोदी शैलीच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. अभिनेत्याचे विनोद आणि कॉमिक टायमिंगवर प्रेक्षक हसल्याशिवाय राहत नाही. सध्या हा अभिनेता गेल्या काही दिवसांपासून चेक बाऊंस प्रकरणामुळे चर्चेत आहे. या प्रकरणामुळे इंडस्ट्रीत मोठी खळबळ माजली.

पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी राजपाल यादवने तिहार जेलमध्ये जाऊन आत्मसमर्पण केलं.  दरम्यान, सरेंडर करण्यापू्र्वी राजपालनं त्याच्या परिस्थितीबद्दल तरुंगातील अधिकाऱ्यांना सांगितलं. त्याच्या या वक्तव्यामुळे चाहते देखील हळहळले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सरेंडर कऱण्यापू्र्वी राजपाल यादव प्रचंड भावुक झाला होता. मी कायद्याचा आदर करणारा नागरिक आहे. मी पळून जाणार नाही. परंतू, सध्या माझ्याकडं खरंच पैसे नाहीत. जर माझ्याकडे पैसे असते तर मी नक्कीच दिले असते. मी कोणाची फसवणूक करण्यासाठी हे केलं नाही."असं त्याने सांगितलं.

काय आहे  प्रकरण?

२ फेब्रुवारी रोजी राजपाल यादवला आत्मसमर्पण करण्याचे आदेश देण्यात आले. तक्रारदार कंपनी मेसर्स मुरली प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड यांना पैसे देण्याचे आश्वासन वारंवार दिले गेले; मात्र ठरलेल्या मुदतीत एकदाही पैसे दिले नाही, असे न्यायालयाने नमूद केलं.

राजपाल यादवने दिल्लीतील कंपनीकडून घेतले होते कर्ज... राजपाल आणि त्याची पत्नी राधा हिने 2010 मध्ये आपला पहिला दिग्दर्शित सिनेमा ‘अता पता लापता’साठी 5 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. परंतु हा पैसा परत न केल्याने दिल्लीतील मुरली प्रोजेक्ट्सने राजपालच्या श्री नौरंग गोदावरी एंटरटेनमेंटविरोधात गुन्हा दाखल केला होता.

English
हिंदी सारांश
Web Title : Rajpal Yadav surrenders, claims lack of funds before Tihar entry.

Web Summary : Actor Rajpal Yadav surrendered to Tihar Jail in a check bounce case. Before surrendering, he expressed his inability to repay the loan, stating he respects the law but currently lacks funds due to financial issues. He denied any intent to deceive the company.
टॅग्स :राजपाल यादवबॉलिवूडसेलिब्रिटी