Join us
Daily Top 2Weekly Top 5

Mamma's Boy: आईच्या वाढदिवसानिमित्त कार्तिक आर्यनचा मोठा निर्णय; अभिनेत्याचं नेटकऱ्यांकडून कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2024 17:19 IST

कार्तिक आर्यन घेणार 'चंदू चॅम्पियन'च्या शूटिंगमधून ब्रेक घेणार आहे, त्याच्या या निर्णयावर नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे.

Kartik Aaryan: अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसतानाही आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये जम बसवणारे फार मोजकेच कलाकार आहेत. अभिनेता कार्तिक आर्यन हे त्यातील एक नाव आहे. कार्तिकने आजवर बरेच हिट चित्रपट दिले आहेत. आपल्या आश्वासक अभिनयाच्या जोरावर अभिनेत्याने चाहत्यांच्या मनात आपले स्थान अढळ केले आहे.

सध्या बॉलिवूडचा चॉकलेट बॉय त्याच्या वैयक्तिक कारणांमुळे चर्चेत आलाय. 'सत्यप्रेम की कथा' या रोमॅंटिक सिनेमानंतर हा अभिनेता लवकरच नव्या रुपात प्रेक्षकांच्या समोर येणार असल्याची माहिती आहे. 'एक था टायगर' आणि 'बजरंगी भाईजान' या चित्रपटाचे दिग्दर्शक कबीर खान यांच्या 'चंदू चॅम्पियन' या चित्रपटामध्ये कार्तिक आर्यन झळणार आहे. बहुचर्चित 'चंदू चॅम्पियन' या आगामी सिनेमाच्या शूटिंगमधून कार्तिक ब्रेक घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आहे. 

येथे पाहा :-

मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेता कार्तिक आर्यन त्याच्या व्यग्र वेळेतून त्याच्या कुटुंबियांसाठी वेळ काढणार आहे. 'चंदू चॅम्पियन' या सिनेमासाठी कार्तिक आर्यन प्रचंड मेहनत घेत आहे. पण सध्या आपल्या आईचा वाढदिवस खास बनवण्यासाठी या सुपरस्टारने शूटिंगमधून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते आहे. आपला पूर्ण वेळ आईसाठी देण्याचा निर्णय त्याने घेतल्याचे सांगण्यात येत आहे. कबीर खान दिग्गर्शित चंदु चॅम्पियन हा चित्रपट एका खेळाडूची जीवनकथा उलगडणारा आहे. या आगामी सिनेमामध्ये अभिनेता चंदूची भूमिका साकारणार आहे. 

टॅग्स :कार्तिक आर्यनबॉलिवूड