Join us

हृतिक रोशनने भाड्याने दिलं आलिशान ऑफिस! घरबसल्या किती कमावणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 13:18 IST

हृतिक रोशन (Hrithik Roshan) हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता आहे.

Hrithik Roshan: हृतिक रोशन हा (Hrithik Roshan) बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता आहे. अलिकडेच अभिनेत्याची डेब्यू फिल्म 'कहो ना प्यार है' पुन: प्रदर्शित करण्यात आली. जवळपास २५ वर्षानंतर सुद्धा या सिनेमाला प्रेक्षकांकडून प्रेम मिळताना दिसत आहे. लवकरच अभिनेता त्याचा आगामी सिनेमा 'वॉर-२' च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. दरम्यान, अभिनेता हृतिक रोशन सध्या चर्चेत आलाय याचं कारणही तितकंच खास आहे. हृतिक रोशनने मुंबईतील त्याच्या मालकीचं आलिशान ऑफिस भाड्याने दिल्याची माहिती समोर येत आहे. 

हृतिक रोशन आता अभिनयाह रिअल इस्टेट मार्केटमध्येही सक्रिय झाला आहे. अभिनेत्याने त्याचं गोरेगाव येथील आलिशान ऑफिस भाड्याने दिलं आहे. या जागेचं एकूण क्षेत्रफळ २७२७ स्क्वेअर फूट इतकं आहे. शिवाय हृतिकला या ऑफिस भाडं दरमहा तब्बल ५ लाख ६२ हजार मिळणार आहे. ज्यातून त्याला मोठा धनलाभ होणार आहे.

मुंबईतील गोरेगावमधील प्रतिष्ठित लोटल पार्क येथे हे आलिशान ऑफिस आहे. मीडियारिपोर्टनुसार हृतिकने या ऑफिसचा व्यवहार करताना साधारण ८८ हजार रुपये इतकी स्टॅम्प ड्युटी भरली होती. तर ९ जानेवारी २०२५ मध्ये अभिनेत्याने या मालमत्तेची नोंदणी केली होती.

टॅग्स :हृतिक रोशनबॉलिवूडसेलिब्रिटीबांधकाम उद्योग