Arjun Kapoor: बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) अभिनयासह त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायमच चर्चेत येत असतो. सध्या 'सिंघम अगेन' या चित्रपटामुळे तो प्रसिद्धीझोतात आला आहे. या सिनेमात अभिनेता अर्जुन कपूर निगेटिव्ह भूमिकेत पाहायला मिळत आहे. दरम्यान 'सिंघम अगेन'मधील डेंजर लंका या त्याच्या व्यक्तिरेखेची प्रेक्षकांकडून प्रशंसा होत आहे. दरम्यान, अर्जुन कपूरने 'इश्कजादे' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. पहिल्याच चित्रपटातून त्याने प्रेक्षकांच्या मनावर छाप उमटवली. या चित्रपटात त्याची आणि परिणीती चोप्राची (Parineeti Chopra) केमिस्ट्री खूपच छान जुळून आली होती. दरम्यान, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्याने 'इश्कजादे' चित्रपटाच्या सेटवरील अनेक किस्से चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
मॅशेबल इंडियाला दिलेल्या मुलाखीत अर्जुन कपूरने 'इश्कजादे' चित्रपटात परिणीती चोप्राच्या कास्टिंगबद्दल भाष्य केलं आहे. या मुलाखतीत चित्रपटात परिणीतीला कास्ट करण्याचा निर्णयाला त्याचा विरोध होता असं त्याने सांगितलं. या मुलाखीत तो म्हणाला, " इश्कजादे' शूटिंगदरम्यान जेव्हा परिणीती सेटवर आली तसे मी जोक्स मारायला सुरूवात केली. परंतु त्यावर परिणीती हसलीच नाही. त्यामुळे मला ती खूपच इरिटेटिंग वाटली."
पुढे अर्जुन कपूर म्हणाला," ती सेटवर नेहमीच खाणाखुणा करत बोलायची. त्यामुळे मला वाटायचं की तिला कामाच्या बाबतीत सिरीअस नाही आहे. मला तेव्हा अक्षरश: आता माझं करिअर संपलं असं वाटलं होतं. कारण ती कधीच उत्साहित नसायची. त्यावेळी परिणीती रणवीर सिंग आणि अनुष्का शर्मासोबत 'लेडीज वर्सेज रिकी बहल' मध्ये काम करत होती. त्यामुळे त्याच्यांकडे गमावण्यासारखं काहीच नव्हतं. पण मला माझं करिअरकडे लक्ष द्यायचं होतं."
"मी २४ वर्षांचा असतानाच ठरवलं होतं की आपलं करिअर बनवायचं आहे. परंतु जेव्हा 'इश्कजादे' साठी मॉक टेस्ट घेण्यात आली तेव्हा परिणीती चोप्राचा अभिनय पाहून मी माझ्या लाईन्स विसरलो होतो. तेव्हा मला वाटलं की नाही ही मुलगी करू शकते. तिला खरंच अभिनयाची जाण आहे." असा खुलासा अर्जुन कपूरने केला.