Join us

सलमान खाननंतर बिग बींच्या सुरक्षेतही वाढ, अक्षय कुमारसारखीच सुरक्षा अमिताभ बच्चन यांना मिळणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2022 16:32 IST

दबंग अभिनेता सलमान खाननंतर आता बच्चन यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारने त्यांना X दर्जाची सुरक्षा दिली आहे. दबंग अभिनेता सलमान खाननंतर आता बच्चन यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यापुर्वी मुंबई पोलिसांकडे बच्चन यांच्या सुरक्षेची जबाबदारी होती.X दर्जाची सुरक्षा म्हणजे काय ?या श्रेणीत २ सुरक्षारक्षक तैनात असतात ज्यामध्ये एक पीएसओ असतो. पीएसओ म्हणजेच पर्सनल सिक्युरिटी ऑफिसर. या श्रेणीत कोणताही कमांडो चा समावेश नसतो. अभिनेता अक्षय कुमार आणि ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांना यापुर्वीच X दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे.सलमान खान ला आहे वाय दर्जाची सुरक्षा

गॅंग्सटर लॉरेंस बिष्णोई याने दिलेल्या धमकीनंतर अभिनेता सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. या श्रेणीत ११ सुरक्षारक्षक तैनात असतात. तर यामध्ये २ कमांडो आणि २ पीएसओ चा समावेश असतो. कोणत्या आधारावर दिली जाते सुरक्षा ?

कोणाच्या जीवाला किती धोका आहे यावर सुरक्षा किती द्यायची हे अवलंबून असते. राज्याच्या इंटेलिजन्स रिपोर्टच्या आधारे हा निर्णय घेतला जातो.

टॅग्स :अमिताभ बच्चनसलमान खानअक्षय कुमार