Join us
Daily Top 2Weekly Top 5

एक-दोन नव्हे तर 4 वेळा एकाच व्यक्तीशी केलं लग्न, 'शरारत' फेम श्रुती सेठची फिल्मी लव्हस्टोरी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2023 17:50 IST

'शरारत' फेम श्रुती सेठच्या फिल्मी लव्हस्टोरीबद्दल जाणून घेऊया.

श्रिंग भ्रिंग सर्वलिंग... भूत, भविष्य, वर्तमान बदलिंग... असा मंत्र म्हणत छोट्या पडद्यावर 'शरारत' या मालिकेनं एकेकाळी  धुमाकूळ घातला होता. या मालिकेती पात्रेही लोकप्रिय झाली होती. यातील सर्वांचे आवडते पात्र म्हणजे जिया अर्थात श्रुती सेठ. उद्या श्रुती आपला ४६ वा वाढिदवस साजरा करणार आहे. यानिमित्ताने आपण तिच्या फिल्मी लव्हस्टोरीबद्दल जाणून घेऊया.

श्रुती सेठनं आमिर खानच्या 'फना' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. फनामध्ये काजोल आणि आमिर खान मुख्य भूमिकेत होते. तर यावेळी श्रुती चित्रपटात काजोलच्या मैत्रिणीच्या भूमिकेत होती. या चित्रपटाच्या सेटवरच श्रुतीची दानिशशी मैत्री झाली.  जो चित्रपटाचा दिग्दर्शक कुणाल कोहलीचा सहाय्यक होता. मग या मैत्रीचे प्रेमात कधी रुपांतर झाले ते त्यांनाही कळले नाही. काही वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर श्रुती आणि दानिश यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 

वेगवेगळ्या धर्माचे असल्याने दोघांनाही त्यांच्या कुटुंबाना आपलं प्रेम पटवून देण्यात बराच वेळ गेला. पण शेवटी दोघांच्याही घरच्यांना त्यांच्या प्रेमापुढे नतमस्तक व्हावे लागले. यानंतर दोघांनी एकच नाही तर चार वेगवेगळ्या पद्धतीने लग्न केले. पहिले श्रुती आणि दानिश यांनी गोव्यात ख्रिश्चन पद्धतीने लग्न केले. नंतर दोघांनी हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न केले. यानंतर मुस्लिम रितीरिवाजांनुसार आणि अखेरीस कोर्ट मॅरेज केले होते.

 मनोरंजन सृष्टीतील एक ओळखीचा चेहरा म्हणून अभिनेत्री श्रुती सेठकडं पाहिलं जातं. श्रुतीनं अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. श्रुती नेहमीच आपल्या बिनधास्त अंदाजासाठी ओळखली जाते.  2001 मध्ये  ‘श्श्श... कोई है’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर डेब्यू केला होता. यानंतर देश में निकला होगा चांद, क्यों होता है प्यार, कुछ कर दिखाना है, धक धक इन दुबई, रिश्ता डॉट कॉम, बाल वीर अशा अनेक मालिकेत ती झळकली आहे. 

टॅग्स :श्रुती सेठबॉलिवूडसेलिब्रिटी