Join us

मुलीसोबत नाताळची सुट्टी एन्जॉय करतेय बिपाशा बसू, क्यूट व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2023 12:40 IST

अभिनेत्री बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर मुलीसोबत नाताळची सुट्टी एन्जॉय करत आहेत. 

अवघ्या काही दिवसांमध्ये 2023 हे वर्ष संपणार आहे. तर नवीन वर्ष, म्हणजेच 2024 चे स्वागत करण्यासाठी लोक सज्ज झाले आहेत. या वर्षातील शेवटचा आणि सर्वात मोठा सण ख्रिसमस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटींही आपल्या कुटुंबासह हा सण साजरा करतात. अभिनेत्री बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर मुलीसोबत नाताळची सुट्टी एन्जॉय करत आहेत. 

बिपाशाने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये बिपाशा ही मुलगी 'देवी'ला एक मोठा ख्रिसमस ट्री दाखवताना दिसत आहे. यावेळी बिपाशा आणि करण ब्लॅक आउटफिटमध्ये दिसले.  कॅप्शनमध्ये लिहिले की, 'इन स्पिरिट ऑफ ख्रिसमस'. या व्हिडीओवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे. 

बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हरने गेल्या महिन्यात म्हणजेच 12 नोव्हेंबरला मालदीवमध्ये देवीचा पहिला वाढदिवस साजरा केला. लग्नाच्या 6 वर्षानंतर बिपाशा आणि करण आई-बाबा झाले आहेत. बिपाशा बसु आणि करण सिंह ग्रोवर अनेकदा इन्स्टाग्रामवर त्यांच्या मुलीची गोंडस झलक शेअर करत असतात.

‘अलोन’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान बिपाशा आणि करण पहिल्यांदा भेटले होते. त्याचेवळी दोघांची चांगली मैत्री झाली. बघता-बघता त्यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मुलीच्या जन्मानंतर बिपाशा बासू ही लाईमलाइटपासून बरीच दूर राहिली. चित्रपटातही काम करणं तिने बंद केलं. आता मात्र बिपाशा कमबॅक करण्यासाठी सज्ज झाली आहे.  

टॅग्स :बिपाशा बासूबॉलिवूडसेलिब्रिटीकरण सिंग ग्रोव्हर