Join us  

बिपाशा बासूच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज; लवकरच करणार कमबॅक, म्हणाली, 'माझ्या मुलीने…'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2023 1:29 PM

अभिनेत्री बिपाशा बासू कमबॅक करण्यासाठी सज्ज झाली आहे. नुकतंच एका कार्यक्रमाला तिनं हजेरी लावली तेव्हा तिने यावर भाष्य केलं.

‘राज' या चित्रपटातील मुख्य अभिनेत्री बिपाशा बासूच्या प्रेमात त्यावेळी कोणी पडलं नसेल. ‘राज' चित्रपटातील तिच्या पात्राने सर्वांची मनं जिंकली. बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्रींपैकी एक म्हणजे बिपाशा. 'अलोन', 'हेराफेरी', 'ओमकारा' 'धूम-२' असे एकापेक्षा एक हिट सिनेमांमध्ये तिनं  काम केलंय. ओमकारातील आयटम नंबर 'बिडी जलाइले' ऑल टाईम हिट ठरलं. मुलीच्या जन्मानंतर बिपाशा बासू ही लाईमलाइटपासून बरीच दूर राहिली. चित्रपटातही काम करणं तिने बंद केलं. आता मात्र बिपाशा कमबॅक करण्यासाठी सज्ज झाली आहे. नुकतंच एका कार्यक्रमाला तिनं हजेरी लावली तेव्हा तिने यावर भाष्य केलं.

पुन्हा चित्रपटात येणार का याबद्दल बोलताना  बॉलिवूडची ग्लॅमरस गर्ल बिपाशा म्हणाली, 'मला अभिनय करायला आवडतो. मी लवकरच कामावर परतणार आहे. मला वाटते की माझी मुलगी मला काम करण्याची परवानगी देईल. अजूनही मी काम आणि मुलीमध्ये संतुलन कसे ठेवावे हे शिकत आहे'. 

बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोव्हर या स्टार कपलने नोव्हेंबरमध्ये एका गोंडस मुलीला जन्म दिला होता. या जोडप्याने त्यांच्या मुलीचं नाव 'देवी बासू सिंह' ठेवलं आहे. अनेकदा बिपाशा आपल्या मुलीचे गोंडस फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.  ‘अलोन’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान बिपाशा आणि करण पहिल्यांदा भेटले होते. त्याचेवळी दोघांची चांगली मैत्री झाली. बघता-बघता त्यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर करण आणि बिपाशाने एप्रिल २०१६ मध्ये लग्न केलं.

अभिनेत्री असण्यासोबतच बिपाशा एक डिझाईनरही आहे. बिपाशाचा शूज, कपडे आणि होम डेकोरेशनचा बिझनेस आहे. 1996 पासून तिने आपल्या मॉडेलिंग करिअरला सुरुवात केली. 2001 मध्ये ‘अजनबी’ या सिनेमाद्वारे बिपाशाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. बिपाशा गेल्या सहा वर्षांपासून एकाही चित्रपटात झळकलेली नाही. 2015 मध्ये आलेल्या 'अलोन' या चित्रपटात ती शेवटची झळकली होती.

टॅग्स :बिपाशा बासूबॉलिवूडसिनेमासेलिब्रिटी