Join us

Bigg Boss Marathi Season 5: रितेश देशमुखला मिळाल्या भाईजानकडून शुभेच्छा, म्हणाला, "सगळ्यांना वेड लावलं..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2024 18:56 IST

सलमान खानने केलं रितेशचं कौतुक

Bigg Boss Marathi Season 5: बिग बॉस हा सर्वात लोकप्रिय रिएलिटी शो. सुरुवातीला हिंदीत शो प्रचंड गाजला. तर काही वर्षांपूर्वी मराठीतही या शोची क्रेझ निर्माण झाली. आज बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाच दिवशी बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले तर दुसरीकडे बिग बॉस हिंदीचा ग्रँड प्रीमिअर पार पडत आहे. बिग बॉस हिंदीचा होस्ट भाईजान सलमान खानने मराठीचा होस्ट रितेश भाऊला त्याच्या स्टाईलमध्ये शुभेच्छा दिल्या आहेत. काय म्हणाला सलमान खान?

बिग बॉस मराठी सीझन ५ च्या ग्रँड फिनालेला सुरुवात झाली आहे. तर काही तासाच बिग बॉस 18 या हिंदी शोचा ग्रँड प्रीमिअर रंगणार आहे. रितेश देशमुखने (Riteish Deshmukh) पहिल्यांदाच मराठी बिग बॉसमध्ये होस्टची धुरा सांभाळली. रितेशचं होस्टिंग पाहून भाईजान सलमान खानने (Salman Khan) त्याचं अभिनंदन केलं. सलमान खानची बिग बॉस सेटवरील क्लिप मराठीच्या फिनालेमध्ये दाखवण्यात आली. यात सलमान म्हणतो, " रितेश भाऊ, लय भारी होतं. सुपर टास्क, सुपर होस्टिंग. एक नंबर एंटरटेन्मेंट केलं. तुमच्या होस्टिंगने सगळ्यांना वेड लावलं. सर्व फायनलिस्टना खूप शुभेच्छा. तसंच आता हिंदी बिग बॉसही सुरु होतंय. आता कल्ला होणारच."

सलमान खान आणि रितेश देशमुख पक्के मित्र आहेत. दोघंही एकमेकांना प्रेमाने भाऊ म्हणतात. रितेशच्या 'लय भारी' सिनेमात सलमान खाननेही कॅमिओ केला होता. त्यांच्या या मैत्रीची झलक बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेतही पाहायला मिळाली.

सूरज चव्हाण, अभिजीत सावंत, निक्की तांबोळी, धनंजय पोवार, अंकिता वालावलकर आणि जान्हवी किल्लेकर हे सदस्य फिनालेपर्यंत पोहोचले आहेत. यांच्यातील कोणाच्या हातात बिग बॉसची ट्रॉफी येते याकडे सर्वांचं लक्ष आहे.

टॅग्स :बिग बॉस मराठीरितेश देशमुखसलमान खानकलर्स मराठी