Join us

मराठमोळ्या शिव ठाकरेची फराह खानच्या वाढदिवसानिमित्त पोस्ट, शेअर केला 'तो' खास फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 14:08 IST

शिव ठाकरेने फराह खानच्या वाढदिवशी शेअर केली खास पोस्ट, म्हणतो...

Shiv Thakre: मुळचा अमरावतीचा असलेला शिव ठाकरे (Shiv Thakre) 'बिग बॉस मराठी'च्या दुसऱ्या पर्वाचा विजेता ठरला आणि तो प्रसिद्धीझोतात आला. त्यानंतर वेगवेगळ्या रिअ‍ॅलिटी शो सहभागी होऊन त्याने प्रेक्षकांचं  मनोरंजन केलं. 'रोडिज', 'बिग बॉस हिंदी' च्या १६ व्या पर्वातही तो झळकला. त्यामुळे तो अनेक बॉलिवूड कलाकारांसोबत जोडला गेला. शिवने बॉलिवूडमधील बऱ्याच सेलिब्रिटींसोबत चांगले संबंध निर्माण केले आहेत. दरम्यान, आज ९ जानेवारीच्या दिवशी  प्रसिद्ध बॉलिवूड कोरिऑग्राफर, चित्रपट निर्माती फराह खानच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. 

शिव ठाकरेची त्याच्या चाहत्यांमध्ये एक वेगळीच क्रेझ आहे. त्याच्याबद्दल जाणून घेण्यास अनेकांना उत्सुकता असते. नुकताच त्याने इन्स्टाग्रामवर फराह खानसोबतचा खास फोटो पोस्ट केला आहे. "वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माझी लाडकी ताई... तू लई भारी आहे." असं कॅप्शन देत शिव ठाकरेने ही पोस्ट फराह खानसाठी शेअर केली आहे. या फोटोमध्ये शिव आणि फराह मजेशीर अंदाजात दिसत आहेत. 

दरम्यान, शिव ठाकरेने शेअर केलेल्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देत कमेंटच्या माध्यमातून फराह खानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्याच्या पाहायला मिळत आहेत. त्यासोबतच शिव-फराहचं मैत्रीचं नातं पाहून त्यांनी कौतुक सुद्धा केलंय. 

टॅग्स :शीव ठाकरेफराह खानसेलिब्रिटीसोशल मीडिया