Join us
Daily Top 2Weekly Top 5

'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेत 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याची एन्ट्री, प्रोमो समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 16:20 IST

'सातव्या मुलीची सातवी मुलगी' ही मालिका सध्या रंजक वळणावर आहे. अशातच मालिकेत मोठा ट्विस्ट आल्याचं पाहायला मिळत आहे. आता या मालिकेत एका नव्या पात्राची एन्ट्री होणार आहे. 

'सातव्या मुलीची सातवी मुलगी' ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. नवीन आणि वेगळा विषय असल्याने या मालिकेवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं. मालिकेतील अद्वैत आणि नेत्राची जोडीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. तर ऐश्वर्या नारकर यांनी साकारलेली खलनायिकाही प्रेक्षकांना भावली. आता या मालिकेत एका नव्या पात्राची एन्ट्री होणार आहे. 

झी मराठीवरील 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' ही मालिका सध्या रंजक वळणावर आहे. अशातच मालिकेत मोठा ट्विस्ट आल्याचं पाहायला मिळत आहे. मालिकेत बिग बॉस मराठी फेम अभिजीत केळकरची एन्ट्री होणार आहे. याचा प्रोमो व्हिडिओ समोर आला आहे. या प्रोमोमध्ये नेत्रा "घरातील स्त्रिया एकत्र असल्या की चैतन्य टिकून राहतं", असं म्हणत आहे. त्यावर इंद्राणी तिला "काळजी करू नकोस या घरातून दूर गेलेली प्रत्येक व्यक्ती घराकडे परत येणार", असं म्हणते. तेवढ्यात दरवाजा वाजत असल्याचं दिसत आहे. आणि दरवाजातून अभिजीत केळकर एन्ट्री घेत असल्याचं दिसत आहे. 

अभिजीत केळकर 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेत केदार हे पात्र साकारताना दिसत आहे. केदारला बघून घरातील सगळेच आश्चर्यचकित झाल्याचं पाहायला मिळत आहे. तसंच सगळ्यांना धक्काही बसल्याचं दिसत आहे. आता केदारच्या एन्ट्रीमुळे मालिकेत कोणतं नवं वळण येणार, हे पाहणं रंजनकारक असणार आहे. 

टॅग्स :अभिजीत केळकरमराठी अभिनेताटिव्ही कलाकार