Join us
Daily Top 2Weekly Top 5

लहानपणी राकेश बापटने केलाय 'या' आजाराचा सामना, 'बिग बॉस'च्या घरात खुलासा करत म्हणाला- "मी खूप वर्ष शाळेत..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 09:39 IST

प्राजक्ता शुक्रेसोबत बोलताना राकेशने त्याच्या बालपणीच्या आजाराबद्दल सांगितलं. लहानपणी राकेशला 'Dyslexic'नावाच्या आजाराचा सामना करावा लागला होता. 

Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस मराठी'मुळे राकेश बापट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. राकेश घरात बऱ्याचदा त्याच्या पर्सनल आयुष्याबद्दल व्यक्त होताना दिसतो. करण सोनावणे, आयुष संजीव यांच्याशी बोलताना राकेशने त्याच्या एक्स पत्नीबद्दल भाष्य केलं होतं. आता प्राजक्ता शुक्रेसोबत बोलताना राकेशने त्याच्या बालपणीच्या आजाराबद्दल सांगितलं. लहानपणी राकेशला 'Dyslexic'नावाच्या आजाराचा सामना करावा लागला होता. 

राकेश प्राजक्ताला म्हणाला, "मी लहान असताना 'Dyslexic' होतो. 'तारे जमीन पर मधल्या मुलासारखा होतो. मी खूप वर्ष शाळेत तोंडी परीक्षा दिली. शब्द वाचायला जायचो तर शब्द उडायचे सगळे. आता पण स्क्रिप्ट वाचताना, दुसऱ्या ओळीवर जाताना मला गोंधळायला होतं. जेव्हा मला पहिल्यांदा स्क्रिप्ट देतात ना, तेव्हा चला रीडिंग करूया, असं नाही करत मी. ते शब्द फ्रेंडली व्हावे लागतात. मी कलेतून एक्स्प्रेस करायला शिकलो".

‘डिस्लेक्सिया’! हा आजार नेमका काय आहे? लक्षणं आणि उपाय.

या आठवड्यात घरात पार पडलेल्या कॅप्टन्सी टास्कमध्ये अनुश्री मानेने राकेश बापटला कॅप्टन्सीच्या रेसमधून बाहेर काढल्यानंतर तो प्रचंड चिडला होता. त्यानंतर प्राजक्ता, करण आणि आयुषमध्ये राकेशच्या स्वभावाबद्दल चर्चा झाली. तेव्हा प्राजक्ताने करण आणि आयुषला याबाबत सांगितलं. "लहानपणी त्याला अशा प्रकारच्या आजाराचा सामना करावा लागल्याने त्यामुळे त्याच्या वाट्याला जे आलंय त्यामुळे तो थोडासा असा बंडखोर झालेला आहे", असं प्राजक्ता म्हणाली. 

English
हिंदी सारांश
Web Title : Rakesh Bapat Reveals Childhood Dyslexia Battle on 'Bigg Boss' Marathi

Web Summary : Rakesh Bapat disclosed his childhood struggle with dyslexia on 'Bigg Boss Marathi'. He shared how it impacted his schooling and reading abilities, explaining his unique approach to script reading. Prajakta noted his past hardship shaped his rebellious side.
टॅग्स :बिग बॉस मराठी ६राकेश बापटटिव्ही कलाकारआरोग्य