'बिग बॉस मराठी ६' मध्ये अभिनेता राकेश बापट त्याच्या शांत तरीही चांगल्या खेळाने प्रेक्षकांचं मन जिंकतोय. राकेश बापटचं खऱ्या आयुष्यात लग्न झालं होतं पण काही वर्षांपूर्वी त्याचा घटस्फोट झाला. अभिनेत्री रिद्धी डोग्रासोबत राकेशने लग्न केलं होतं. परंतु लग्नानंतरही त्यांच्यातली मैत्री अजूनही टिकून आहे. बिग बॉस मराठीच्या घरात राकेशने रिद्धीबद्दल खास खुलासा केला. तो ऐकून सर्वांच्या भुवया उंचावल्या.दीपाली सय्यदसोबत बोलताना राकेशने एक्स पत्नीचा अर्थात रिद्धीचा विषय काढला. राकेश म्हणाला, ''मस्त आहे ती, छान आहे, बेस्ट आहे. आमच्या मतांमध्ये फरक होता. स्ट्राँग असे फरक नव्हते. एक समजुतदारपणा होता. पण लग्न झालेलं जोडपं म्हणून आम्ही यशस्वी होत नव्हतो. मग मी म्हटलं लग्न करण्यापेक्षा मित्र म्हणूनच आपण जास्त चांगले आहोत.''
''मग तिला पण कोणीतरी चांगलं बोलायचं, मलाही कोणीतरी चांगलं बोलायचं. म्हटलं तो स्कोप तरी असू दे. अडकून राहण्यात काय अर्थ आहे. आम्ही ट्राय केलं. असं नाही की आम्ही काहीच प्रयत्न केले नाहीत. पण ते कधीकधी होतं की, नाही टिकत. आम्ही दोघंही मूव्ह ऑन नाही झालो. लग्नानंतर रिलेशनशिप्स झाले. पण आता नाही वाटत मी परत लग्न करेल मी. रोज आम्ही बोलतो. आठवड्यातून दोन-तीन वेळा बोलतो. माझ्या चांगल्या मित्रांपैकी ती एक आहे.'', अशाप्रकारे अत्यंत आदराने राकेशने एक्स पत्नीविषयी खुलासा केला.
Web Summary : Rakesh Bapat, in Bigg Boss Marathi 6, revealed that he and Riddhi Dogra divorced because they were better as friends than as a married couple. Despite relationships after marriage, they remain close friends and talk often.
Web Summary : बिग बॉस मराठी 6 में राकेश बापट ने खुलासा किया कि रिद्धि डोगरा और उन्होंने तलाक इसलिए लिया क्योंकि वे एक विवाहित जोड़े की तुलना में दोस्त के रूप में बेहतर थे। शादी के बाद रिश्ते होने के बावजूद, वे करीबी दोस्त बने हुए हैं और अक्सर बात करते हैं।