Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोण होणार विनर? बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेची वेळ नेमकी काय? नवीन प्रोमो बघून घ्या जाणून

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2024 12:01 IST

बिग बॉसच्या आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच बिग बॉसच्या ग्रँड फिनालेची वेळ लवकरची घेण्यात आलीय. जाणून घ्या (bigg boss marathi 5)

'कलर्स मराठी'वरील 'बिग बॉस मराठी'च्या सर्वात जास्त गाजलेल्या या सीझनच्या ग्रँड फिनालेची सगळ्यांना उत्सुकता आहे. दोनच दिवसात बिग बॉस मराठीची ग्रँड फिनाले संपन्न होणार आहे. गेले दोन आठवडे भाऊचा धक्क्यावर गैरहजर असलेल्या रितेश देशमुखची ग्रँड फिनालेमध्ये दमदार एन्ट्री होणार आहे. रितेश ग्रँडफिनालेच्या सूत्रसंचालनाची सर्व जबाबदारी सांभाळणार आहे. इतकंच नव्हे तर बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेची वेळ सांगणारा प्रोमो रिलीज झालाय.

बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेची वेळ काय?

६ ऑक्टोबरला रविवारी, संध्याकाळी ६ वाजता, 'बिग बॉस मराठी'च्या या सीझनचा ग्रँड फिनाले जल्लोषात पार पडणार आहे. ग्रँड फिनालेचं काऊंटडाऊन सुरू झाल्याने प्रेक्षकांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. ६ ऑक्टोबरला या सीझनचा कोण विजेता होणार आणि 'बिग बॉस मराठी'च्या मानाच्या ट्रॉफीवर कोण आपलं नाव कोरणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. महाराष्ट्राच्या जनतेला 'बिग बॉस मराठी'च्या माध्यमातून मनोरंजनाची नवी पर्वणी मिळाली. त्यामुळे सर्वांचं लक्ष ६ ऑक्टोबरला संध्याकाळी ६ वाजता असणार यात शंका नाही. अभिजीत सावंत, अंकिता वालावलकर, सूरज चव्हाण, जान्हवी किल्लेकर,  निक्की तांबोळी आणि धनंजय पोवार या सुपर ६ पैकी कोण जिंकणार? याची सर्वांना उत्सुकता आहे.

रितेशची ग्रँड फिनालेसाठी ग्रँड एन्ट्री

रितेश भाऊंची लयभारी स्टाईल,  तरुणांमध्ये त्यांची असलेली क्रेझ , त्यांची धमालमस्ती, कल्ला आणि सदस्यांमध्ये त्यांचा असलेला आदरयुक्त दरारा या सर्वच गोष्टींमुळे हा सीझन गाजला. रितेश यांच्या 'भाऊच्या धक्क्या'ने टीआरपीचे उच्चांक गाठले. वीकेंडला सदस्यांची शाळा घेण्यासोबत त्यांची पाठ थोपटण्याचं कामदेखील रितेश भाऊंनी त्यांच्या स्टाईलने केलं.  आपल्या स्टाईलने त्यांनी  'बिग बॉस मराठी'ला एक वेगळंच ग्लॅमर आणलं. त्यामुळे ग्रँड फिनालेला रितेश देशमुख काय कमाल करणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे.

टॅग्स :बिग बॉस मराठीरितेश देशमुखकलर्स मराठी