Join us
Daily Top 2Weekly Top 5

Bigg Boss Marathi 2 : बिग बॉसच्या घरात शिव ठाकरेने केला एक्स गर्लफ्रेंडबाबत खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2019 18:08 IST

घरातील सदस्य शिव ठाकरेने त्याच्या एक्स गर्लफ्रेंडचा खुलासा केला आहे.

बिग बॉसच्या घरात सध्या विविध घडामोडी पहायला मिळत आहेत.एकीकडे माधव देवचक्के बिग बॉसच्या घराबाहेर पडला. तर दुसरीकडे बिग बॉसच्या घरातून चेक बाउन्स प्रकरणी अटक झालेले अभिजीत बिचुकले यांनी घरात पुन्हा एन्ट्री केली. दरम्यान अनेक सदस्यांची गुपिते देखील समोर आली आहे. वूटच्‍या अनसीन अनदेखाच्‍या क्लिपमध्ये घरातील सदस्य शिव ठाकरेने त्याच्या एक्स गर्लफ्रेंडचा खुलासा केला आहे.

हिना पांचाळ आणि शिव ठाकरे या दोघांमध्ये संभाषण सुरू होते. ते दोघे सलमान आणि करिश्माच्या दुल्‍हन हम ले जायेंगे चित्रपटातील गाणं रुठना मनाना है प्‍यार की अदा, कैसे जियूंगा मै तुझसे होके जुदा हे गाणं गात असतात. गाणं गात असताना शिवला त्याच्या एक्स गर्लफ्रेंडची आठवण येते. ‘हे गाणे मला फार आवडते. मी माझ्या एक्स गर्लफ्रेंडचा राग घालवण्यासाठी हे गाणे गायचो. तिलाही हे गाणे फार आवडायचे. ती जर आज मला पाहत असेल तर तिला वाईट वाटत असेल. ती खूप छान होती असे शिव म्हणाला.

त्यानंतर शिवने खुलासा केला की, आम्ही दोघे ९ वर्षे रिलेशनशीपमध्ये होतो. नंतर माझ्या चुकीमुळे आम्ही वेगळे झालो. त्यानंतर हिनाने शिवला ‘तुमचं ब्रेकअप का झालं? काय केलस तू?’ असा प्रश्न विचारला.

त्यावर शिवने ती माझी खूप काळजी घ्यायची, मला काय आवडतं काय नाही हे तिला माहित होतं. पण माझीच चूक होती. मी तिला लग्नाची कमिटमेंट दिली नव्हती आणि तिच्या घरी लग्नासाठी मागे लागले होते. माझ्यासाठी माझे करिअर फार महत्वाचे होते. त्यामुळे आम्ही दोघे वेगळे झालो, असा खुलासा शिवने केला.

हिनाने नंतर त्‍याला समजवायचा प्रयत्‍न केला की, त्‍यांनी त्यांच्या नात्‍याला आणखी एक संधी द्यायला हवी. पण शिवने त्‍याची एक्‍स आता तिच्‍या आयुष्‍यात पुढे गेली असल्याचं सांगितलं.

शिवची ही गर्लफ्रेंड कोण होती? हे जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

टॅग्स :बिग बॉस मराठीशीव ठाकरेहिना पांचाळ